वैतागलेल्या शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयाला टाळे ठोकले

विजेच्या लपंडाव सुरु
Sagaon
SagaonSakal
Updated on

सागाव - येथील संतप्त ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयाला विजेचा गेल्या काही दिवसांपासून चाललेल्या लपंडावाला कंटाळून टाळे ठोकून संताप व्यक्त केला. येथील परिसरात शेती पंपासाठी सोमवार ते गुरुवारी सकाळी ९ ते ५ पर्यंत वीज उपलब्ध असते. तर शुक्रवार ते रविवारी रात्री वीज उपलब्ध असते. परंतु नियोजित वीज वेळापत्रक गेल्या चार दिवसांपासून कोलमडले असून, पाण्याअभावी काही पिके चार दिवस विजेच्या लपंडावामुळे वाळत चालली आहेत.

रात्रीच्या वीजेच्या वेळापत्रकानुसार शेतकरी शेतात गेले तर बिबट्याची भीती आहे. रात्री अपरात्री शेतात गेल्यास वीज ठराविक काही तास, मिनिटांच्या अंतराने गायब होते. त्यामुळे लोकांचा संताप वाढत चालला आहे. रात्री-अपरात्री काहीतरी वीजपुरवठ्यात काही खंड पडल्यास दुरुस्तीसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांना काम सांगता येत नाही. वितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तत्काळ लक्ष घालून वीज पुरवठा सतत खंडीत न करता सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करावेत. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या वेळी सरपंच तात्या पाटील, उपसरपंच सत्यजित पाटील, उद्धव पाटील, सुशांत पाटील, विश्वासचे संचालक बाबासो पाटील, शिवाजी माने, श्रीकांत शिद, महेश बुगड, निवास पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.