Sangli Politcs : युवराजांच्या साथीने नेत्यांची मांडणी ; कवठेमहांकाळ तालुका ,पुढच्या पिढीसाठी बेरजेच्या राजकारणाची धडपड

तालुक्याच्या राजकारणात अनेक राजकीय बदल झाल्याचे दिसून आले आहे.
sangali
sangali sakal
Updated on

कवठेमहांकाळ - राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कवठेमहांकाळ तालुक्याच्या राजकारणात मातब्बर नेत्यांनी आपल्या युवराजांना समवेत घेत नवी मांडणी सुरू केली आहे. नव्या पिढीला लोकांत रुजवण्यासाठी बेरजेचे राजकारण पाहायला मिळते आहे. खासदार संजय पाटील, आमदार सुमन पाटील आणि माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्या पुढच्या पिढीने युवकांची फळी बांधायला सुरवात केली आहे. त्यामुळे कवठेमहांकाळ शहर, तालुक्याचे वातावरण ढवळून निघाले आहे.

तालुक्याच्या राजकारणात अनेक राजकीय बदल झाल्याचे दिसून आले आहे. गत काही महिन्यांपासून खासदार संजय पाटील, युवा नेते प्रभाकर पाटील यांनी तालुक्यात दौरे केले. प्रभाकर विधानसभेला दंड धोपटून पुढे येत आहेत.

त्यांनी गावोगावी भेटी देत गणेशोत्सवात तरुणांशी संवाद साधला. त्यांचा कार्यकर्ते ‘भावी आमदार’ असा प्रचार करत आहेत. भाजपने तालुक्यात जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील, युवा नेते रोहित पाटील यांनी तालुक्यात विकासकामांच्या ‘मार्केटिंग’चा धडाका लावला आहे. रोहित पाटील यांनी संपर्कात सातत्य ठेवतानाच सोशल मीडियातून आक्रमकता दाखवायला सुरवात केली आहे.

sangali
Air Force : नजर ना लगे ! भारताला मिळाले पहिले C-295 मिलिट्री प्लेन; राजनाथ सिंहांनी रक्षणासाठी बांधला पवित्र धागा

खासदार-आमदार गटाचे दौरे सुरू असताना माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी त्याकडे तटस्थपणे पाहण्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्या हालचाली संथ आणि छुप्या आहेत. युवा नेते राजवर्धन घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम झाले. त्याचे ‘मार्केटिंग’ केले गेले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तीनही नेते आणि त्यांचे ‘युवराज’ ॲक्टिव्ह होताना दिसताहेत.

sangali
Satara : दुष्काळी भागाला मिळणार जादा दोन टीएमसी पाणी

सध्या विविध विकासकामे व सणांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी संपर्क वाढवला आहे. बेरजेचे राजकारण कुणाच्या फायद्याचे आणि कुणाला डोकेदुखी ठरेल, हे निवडणुकांवेळी कळेलच, मात्र दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते नेमके कुणाचे पारडे जड ठरेल, याचा अंदाज घेऊन सावधपणे पावले उचलत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांनी तीच भूमिका घेतली आहे.

sangali
Satara News : ‘जिहे-कठापूर, टेंभू’च्‍या पाण्‍याचा फायदा

तालुक्यात काही महिन्यांपूर्वी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येत स्वाभिमानी आघाडी निर्माण केली. या आघाडीने तालुक्यातील विविध प्रश्नांवर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले. आघाडीत सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सध्या पुन्हा एकदा तालुक्यात बेरीज-वजाबाकीचे राजकारण सुरू झाल्याने स्वाभिमानी आघाडीचे पदाधिकारी कोणता निर्णय घेणार, हेही पाहणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.