सांगली : चांदोली धरण पर्यटकांसाठी खुले

पर्यटकांसाठी खुले करण्यात आले असल्याची माहिती शाखा अभियंता टी. एस. धामणकर यांनी दिली
सांगली : चांदोली धरण पर्यटकांसाठी खुले
सांगली : चांदोली धरण पर्यटकांसाठी खुले sakal
Updated on

वारणावती : शिराळा तालुक्यातील चांदोली धरण शनिवारपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले असल्याची माहिती शाखा अभियंता टी. एस. धामणकर यांनी दिली आहे. चांदोली धरण हे महाराष्ट्रातील दोन नंबरचे मातीचे धरण आहे. चांदोली धरण हे बारमाही हिरवळीने नटलेले असल्यामुळे पर्यटकांचा नेहमी चांदोलीकडे ओढा वाढत आहे. एक नोव्हेंबरला पर्यटकासांठी सुरू होणारे चांदोली धरण पर्यटकांच्या विनंतीवरून धरण प्रशासनाने शनिवारी सकाळपासून चांदोली धरण पर्यटकासांठी खुले केल्याने पर्यटकांच्यातून समाधानाचे वातावरण पसरले आहे.

सांगली : चांदोली धरण पर्यटकांसाठी खुले
नगास मिळाले नग

धरण पाहण्यासाठी पर्यटकांना सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत विनामूल्य पास वारणावती येथील शाखा कार्यालयात देण्याची व्यवस्था धरण प्रशासनाने केली आहे. पर्यटकांनी पास काढतेवेळी आधारकार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसंन्स यापैकी कोणतेही एक दाखवणे गरजेचे आहे. पर्यटकांना सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरण पाहता येऊ शकते.

संपूर्ण धरण परिसर सीसीटीव्ही कॕमेराच्या कक्षेत आहे. धरणावर दुचाकी, चारचाकी वाहनांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांनी धरणाच्या मुख्य गेटवर वाहने थांबवून धरणावर पायी चालत जावे लागणार आहे. धरण प्रत्येक गुरुवारी पर्यटकांच्यासाठी बंद राहणार आहे. पर्यटकांनी धरणावर गेल्यावर धरणाच्या जलाशयात उतरू नये, असे आदेश धरण प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. तसेच धरण परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ शूटिंग करण्यास मनाई आहे.पर्यटकांनी कोरोना नियमांचे पालन करून धरण पहावे, असे आवाहन शाखा अभियंता टी. एस. धामणकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.