सांगली: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या आजच्या सर्वसाधारण सभेच्या आधी आज स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज बँकेच्या प्रधान कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करीत बड्यांची कर्जे माफ करण्याच्या निर्णयाला विरोध केला. भाजप,राष्ट्रवादी, काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांच्या संस्थाची थकीत कर्जे माफ करण्याचा आज विषय वार्षिक सभा पटलावर होता. मात्र काल अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी माघार घेत हा विषय तुर्त स्थगित ठेवला होता.
श्री. खराडे म्हणाले,‘‘ निनाई, डफळे, माणगंगा, यशवंत, केन अॅग्रो कारखान्यांच्या वाहतूक यंत्रणेची कर्जे, याशिवाय वसंतदादा शाबू, प्रकाश अग्रो, नेर्ला सोया आदीसह अन्य संस्थाची सुमारे १०० कोटींची कर्जे व व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला होता. शेतकऱ्यांची पीक कर्जे, मध्यम मुदत, ट्रॅक्टरसह अन्य वाहन कर्जे थकली, की जप्तीची कारवाई केली जाते. मात्र नेत्यांची कर्जे थकली की त्यांना कायद्याच्या पळवाटा काढून कर्जे दिली जातात. ज्यांची बँक आहे. त्या शेतकऱ्यांना मात्र भिकाऱ्यासारखे कर्ज मागावे लागते, हे वास्तव आहे. नेत्यांची कर्जे माफ होत असतील, तर शेतकऱ्यांचीही कर्जे माफ करावीत. बँक राजकारणाचा अड्डा बनली आहे. त्यामुळेच सर्व बुडवे, थकबाकीदार बँकेचे संचालक बनले आहेत. ही बँक शेतकऱ्यांची की संचालकांची हे आम्ही अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आज जाणार होतो. पोलिस दडपशाही करून आमचे आंदोलन मोडून काढण्याचा त्यांचा प्रयत्न होता. प्रसंगी आम्हाला रक्त सांडावे लागले तरी चालेल मात्र शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमची लढाई सुरुच राहील. आम्ही शिवछत्रपतींचे मावळे आहोत हे पोलिसांनीही लक्षात घ्यावे.’’
श्री खराडे म्हणाले,‘‘ बँकेत भाजपसोबत राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. हे सारे एकत्र येऊन एक रकमी परतफेड योजना राबवत आहेत. व्याज माफी, कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली पाहिजे. जिल्हाचे पालकमंत्री भाजपच्या जिल्हाध्यक्षांचे कर्ज माफ करीत आहेत. राज्यात ही मंडळी विरोधात लढतात आणि इथे एकत्र येऊन बँक लुटतात.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.