सांगली : भाजप-राष्‍ट्रवादीचा पुन्हा दोस्ताना

महापालिकेत नवी समीकरणे : काँग्रेस विरोधी पक्षाच्या भूमिकेतच, पुलाचे भूमिपूजन िनमित्त
सांगली : भाजप-राष्‍ट्रवादीचा पुन्हा दोस्ताना
सांगली : भाजप-राष्‍ट्रवादीचा पुन्हा दोस्तानाsakal
Updated on

सांगली : कृष्णा नदीवरील आयर्विन पुलास पर्यायी समांतर पुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने महापालिकेच्या राजकारणात भाजप-राष्ट्रवादीचा ‘मधुचंद्र’ सुरू झाला असून पुन्हा एकदा काँग्रेस बेदखल होत आहे. जिल्ह्यात जयंत पाटील यांचा भाजपशी असलेला याराना खूपच जुना आहे. इतकी इथल्या भाजपची ओळखच बीजेपी नव्हे, तर जेजेपी होती. ही ओळख पुसण्यासाठी गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीवेळी भाजपच्या खासदारांना ‘आता...नो जेजेपी ओन्ली बीजेपी’ असा खुलासा करावा लागला, मात्र आता जिल्ह्यात पुन्हा एकदा भाजप-राष्ट्रवादीचा याराना सुरू झाला आहे. महापालिकेत काँग्रेसच्या मदतीने सत्तेत आलेल्या राष्ट्रवादीने तसे संकेत दिले आहेत. कालच्या समारंभात त्याची फक्त चुणूक पहायला मिळाली.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेची राज्यात महाआघाडी आहे. महापालिकेत महापौर निवडणुकीत भाजपचा करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे भाजपसोबतचे सख्य वाढत आहे. स्थायी समितीसह अन्य सभापती निवडीत राष्ट्रवादीने घेतलेली बघ्याची भूमिका आणि काँग्रेसची ढिलाई यामुळे भाजपचं ‘जमलं’. मात्र त्यामागे राष्ट्रवादीने महापालिकेत भाजपशी सूत जुळल्याचे कारण होते. समाजकल्याण समिती निवडीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराने माघार घेवून भाजपला बिनविरोधची संधी दिली. एकूणच यावरून भाजप-राष्ट्रवादीत अंतर्गत सलोखा आहे का? ही चर्चा सुरू झाली.

सांगली : भाजप-राष्‍ट्रवादीचा पुन्हा दोस्ताना
नागपूर : संत्रा उत्पादकांच्या डोळ्यांत पाणी

आयर्विनला पर्यायी समांतर पूल भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी मंजूर करून आणला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या पुलास मान्यता देवून त्यासाठी २५ कोटींचा निधीही दिला. हा पूल कसा करायचा, यावरून वाद झाले. यातही व्यापाऱ्यांच्या बाजूने राष्ट्रवादीचे शेखर माने आणि संजय बजाज यांनी पुढाकार घेत पहिल्या आराखड्यास विरोध केला होता. त्यामुळे पूल लटकला. राज्यातील सत्तांतरानंतर जयंतरावांनी भाजप नेत्यांसोबतचे सख्य कायम ठेवत वाटचाल सुरू केली आहे. पुलाचे भूमिपूजन कार्यक्रमात त्यांनी आमदार सुधीर गाडगीळ यांची स्वच्छ, प्रामाणिक, सात्विक प्रतिमेचे आमदार असे कौतुक केले. त्याचवेळी त्यांनी आमचे महापौर दिग्विजय सूर्यवंशीही तसेच आहेत, असे सांगून तुलना केली. एकीकडे भाजपशी दोस्ताना सांगत असताना त्यांनी कॉंग्रेसला मात्र पूर्ण दुर्लक्षित केले.

सांगली : भाजप-राष्‍ट्रवादीचा पुन्हा दोस्ताना
नागपूर : सायबर गुन्हेगाराच्या जाळ्यात अख्खे कुटुंब

काँग्रेसच्या नेत्यांना निमंत्रणच नाही. त्यांचा कुठेही उल्लेख नाही. कॉंग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील आणि प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांना डावलताना त्यांनी महापालिकेत आपली पुढची चाल कशी असेल हेच स्पष्ट केले. कधीकाळी त्यांनी भाजपसोबत महापालिकेत महाआघाडीचा प्रयोग केल्याची आठवणच काल करून दिली. यापूर्वी स्वातंत्र्यदिनी सांगलीत चिल्ड्रन पार्क आणि काळी खण सुशोभीकरण अशा कामांवेळी तेच घडले होते. चार दिशांना चौघांची तोंडे अशी सांगलीत कॉंग्रेस नेत्यांची स्थिती आहे. पूर्वीप्रमाणे मदन पाटील गटाने यावेळीही बहिष्कार टाकला होता. मात्र त्यापलीकडे या गटाकडे फ्रंटवर येऊन लढण्याची इच्छाशक्ती दिसलेली नाही. महापालिका निवडणुका दोन वर्षांनंतर आहेत. राष्ट्रवादीची सध्याची तयारी याल तर सोबत, अन्यथा तुमच्याविना अशीच आहे.

आवटींचा निर्णय ‘योग्य’

पालकमंत्री जयंत पाटील यांनी गाडगीळांना व्यासपीठावरच डोस दिला. त्यांनी स्थायी सभापतिपदी निरंजन आवटी यांची निवड करण्याचा निर्णय योग्य होता, असे जाहीर प्रमाणपत्र दिले. त्याचवेळी ‘तुम्ही नसते तर आम्ही’ अशी पर्यायी योजनाही होती, असे त्यांनी स्पष्ट केले. सुरेश आवटी यांनी सभापती निवडीआधी त्यांची घेतलेली भेट कशासाठी याचा जयंतरावांनीच जाहीर खुलासा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.