Sangli Crime : डोक्यात गॅस स्टोव्ह घालून तरूणाचा निर्घृण खून

संजयनगरला घटना ; किरकोळ वादातून चार जणांचे कृत्य
sangli crime brutally murdering young man gas stove on his head over minor dispute
sangli crime brutally murdering young man gas stove on his head over minor disputeSakal
Updated on

सांगली : संजयनगर येथील झेंडा चौकात नितीन आनंदराव शिंदे (वय ३२) या तरूणाच्या डोक्यात गॅस स्टोव्ह घालून निर्घृण खून करणअयात आला. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडला. किरकोळ वादातूनही हा खून चौघांनी केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली रात्री उशीरापर्यंत पंचनामा सुरू होता. दरम्यान, जिल्ह्यात एका मागून एक खून होत असल्याने पोलिस चक्रावले आहे.

याबाबात घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की नितीन शिंदे संजयनगर येथील खेराडकर पेट्रोलपंपाजवळील झेंडा चौकात राहण्यास आहे. त्याची मालवाहतूक गाडी असून तो व्यवसाय करतो. नितीनच्या वडिलांची वखार आहे.

नितीन कामवरून परतल्यानंतर आज सांयकाळी घराबाहेर पडला होता. त्यावेळी त्याची एका परप्रांतीयाच्या घराजवळ तो आला होता. त्या चौकात संशयित आले. त्याच्या किरकोळ कारणातून वादावादी झाली.

त्यानंतर अर्धा तासाने नितीन हा घरात गेला. त्यावेळी संशयित पुन्हा दुचाकीवरून आले. त्यानंतर पुन्हा वाद झाला. वाद टोकाला गेल्यानंतर संशयितांनी तेथील गॅस स्टोव्ह उचलून नितीनच्या डोक्यात घातला. एकच वर्मी घाव बसल्याने नितीन रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले.

अतिरक्तस्त्राव झाल्याने नितीनचा जागीच मृत्यू झाला. हा खून किरकोळ कारणातून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अद्याप ठोस कारण समजू शकले नाही. खूनाची माहिती समजताच पोलिस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, निरिक्षक सुरज बिजली, विनोद साळुंखे, संतोष पुजारी, कपिल साळुंखे यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्री. जाधव यांनी तपासाच्या सूचना दिल्या. घटनास्थळी पंचनामा करून हा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिलमध्ये पाठवला.

घरासमोर हाकेच्या अंतरावर खून

दरम्यान, नितीन शिंदे याचा खून त्याच्या राहत्या घरापासून अवघ्या दोनशे फुटाच्या अंतरावर झाला आहे. पण हा खून कोणत्या कारणातून झाला हे कारण मात्र समोर आले नाही. सांयकाळी त्याची चौघांबरोबर वादावादी झाल्याचे परिसरातील लोकांनी सांगितले.

सीसीटीव्ही पोलिसांच्या ताब्यात

संजयनगर पोलिसांनी तपास चक्रे फिरवत तत्काळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यावेळी चौघेजण दुचाकीवरून त्याठिकाणी आल्याचे एका सीसीटीव्हीत स्पष्ट झाले. ते पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहिती आधारे रात्री उशीरा संशयितांचा शोध घेण्यासाठी दोन पथके रवाना करण्यात आली होती.

श्‍वान घुटमळले

खुनाच्या घटनेनंतर सांगली श्‍वान पथकास तातडीने पाचारण करण्यात आले. श्‍वान पथकाने दिलेल्या वासाच्या आधारे संशयितांच्या हालचालाचा शोध घेण्यात आला. परिसरातील काही अंतरावरच श्‍वान घुटमळे.

फॉरेन्सिक दाखल

घटनेनतंर फॉरेन्सिर पथकही दाखल झाले होते. घटनास्थळावर पडलेला गॅस स्टोव्हवरील हाताचे ठसे, घरातील हाताचे ठसे, रक्ताचे नमुनेही ताब्यात घेतले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.