प्रेम प्रकरणातून मुलाच्या वडिलांना विजेच्या खांबाला बांधून जीवघेणी मारहाण; इतकी हैवानियत येते कुठून?

मांगले या गावी हैवानालाही लाजवेल आणि युपी-बिहारच्या गुन्हेगारीला मागे टाकेल, असा खून केला गेला.
Sangli Crime News
Sangli Crime Newsesakal
Updated on
Summary

गेल्या चार दिवसांत एका मागोमाग एक खुनाची मालिका सुरू आहे. हत्या करून आरोपी कित्येकदा स्वतःच पोलिस ठाण्यात हजर होतात.

शिराळा (Shirala) तालुक्यातील मांगले या गावी बुधवारी पहाटे हैवानालाही लाजवेल आणि युपी-बिहारच्या गुन्हेगारीला मागे टाकेल, असा खून केला गेला. मुलाने मुलीला (love Affair) पळविले म्हणून मुलाच्या वडिलांवर विजेच्या खांबाला बांधून अमानुष हल्ला केला. त्यात त्या बापाचा अंत झाला. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या कृत्याने अख्खा जिल्हा सुन्न झाला. आज-काल कोंबड्या कापल्या जाव्यात तसे सांगली जिल्ह्यात खून केले जात आहेत. पोलिस पकडतील, शिक्षा होईल याचे भय नराधमांना उरलेले नाही..

Sangli Crime News
महाराष्ट्र सरकारचा कर्नाटकात हस्तक्षेप खपवून घेणार नाही; 'या' योजना लागू केल्याने सिद्धरामय्या संतापले

गेल्या चार दिवसांत एका मागोमाग एक खुनाची मालिका सुरू आहे. हत्या करून आरोपी कित्येकदा स्वतःच पोलिस ठाण्यात हजर होतात, म्हणजेच आपण यातून सुखरूप बाहेर पडणार, ही खात्रीच गुन्हेगारांना झाली आहे. तो खून जमिनीच्या वादातून, पैशासाठी, अनैतिक संबंधातून असेल किंवा प्रेम प्रकरणातून... कोंबड्या कापल्यासारखी माणसे कापली जात आहेत.

Sangli Crime News
आनेवाडी टोलनाका वाद : आमदार शिवेंद्रराजेंसह 48 जणांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता, काय घडलं होतं 'कोजागरी'च्या रात्री?

माणसाच्या अस्तित्वाला येथे काही अर्थ उरलेला नाही. आपल्याकडे कायदा आणि न्यायव्यवस्था आहे का, असा प्रश्‍न पडतोच. माणूस स्वस्त झालाय का? नवीन वर्ष २०२४ ची सुरुवात अतिशय दुर्दैवी घटनांनी झाली. वैर असते, संघर्ष असतो... त्यातून मुडदे पडावेत, इतकी हैवानियत येते कुठून? कायद्याचा धाक संपतो, तिथे हा विचार सुरू होतो. खून करावा कसा आणि पचवावा कसा, याचे प्रशिक्षण देणाऱ्या मालिका व सिनेमे निघू लागले तर करायचे काय? कायद्यातील पळवाटांचा आधार घेत आरोपी सुटताहेत. खुनांचे प्रमाण वाढले आहे.

या स्थितीला पोलिस प्रशासन तेवढेच जबाबदार आहे. गुन्हेगारीत अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग चिंतेचा विषय आहे. नशेखोरी त्याच्या मुळाशी आहे. एकजण आपल्या मित्राला मारतो, एकाच शाळेतील विद्यार्थी आत्महत्या करतात, मुलींना पळवून नेले जाते, मुली पळून जातात, कुटुंब एकमेकांना संपवतात... यात गावांतील दादा, मामा, अण्णा, काका, तात्या या पोरांना फूस लावतात. पाठीशी घालतात. तकलादू राजकारणासाठी चुकीच्या गोष्टींच्या पाठीशी उभी राहतात. यातून सामाजिक व्यवस्था ढासळत चालली आहे...

Sangli Crime News
राज्यसेवा परीक्षेत शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पोरानं राज्यात पटकावला प्रथम क्रमांक; उपजिल्हाधिकारी पदाचं स्वप्न झालं पूर्ण

गेल्यावर्षी जिल्ह्यात ६९ खून झाल्याचे पोलिस अधीक्षकांनीच सांगितले. ते थांबवण्यासाठी पोलिस काय करत आहेत, यावर चर्चा तर झालीच पाहिजे. कौटुंबिक कलहाच्या विषयातील तणाव कमी करण्यासाठी पोलिसांची काय भूमिका आहे. गुन्हेगारीतून खून झाला, तर ते पोलिसांचे अपयश; इतर खुनांत पोलिस तपासापुरते, असे म्हणून चालणार नाही. प्रत्येक खुनाची एक कडी पोलिस ठाण्याशी जोडलेली असते. तिथे पोलिस गंभीर आहेत का?

दप्तराबाहेर मिटणाऱ्या प्रकरणांचा शेवट खुनात होतोय का, हा विषय स्वतंत्रपणे अभ्यासणे गरजेचे आहे. मुलगा आणि मुलगी पळून जाणे, ही गोष्ट आकाश कोसळावं आणि एखाद्याचा मुडदा पाडावा, इतक्या गंभीर वळणाकडे का निघाली आहे. एका निष्पाप व्यक्तीचा त्यात बळी गेला. त्याची अमानुषपणे त्याच्या पत्नीसमोरच हत्या केली गेली. समाज सदसद्विवेकबुद्धी हरवत चाललाय. दुसऱ्या बाजूला कायद्याच्या रक्षकांचे भय उरले नाही, असाच निष्कर्ष त्यातून काढावा लागतो.

Sangli Crime News
MPSC Exam : दोनवेळा अपयश, तिसऱ्या प्रयत्नात यश! बोरगावच्या पूजा वंजारी 'एमपीएससी'त मुलींमध्ये प्रथम

खुनाचे सत्र

  • १८ जानेवारी- कसबेडिग्रजला शेतजमिनीच्या वादातून माजी सरपंचास मारहाण, मृत्यू.

  • १७ जानेवारी- पेठनाक्याला वादातून युवकाचा खून

  • १६ जानेवारी- बामणोलीत प्रेमप्रकरणाच्या संशयावरून मित्राकडून हत्या

  • १३ जानेवारी- सावकाराच्या जाचाने तासगावात तरुणाचा गळफास

  • ११ जानेवारी- विट्यात ऊसतोड कामगाराचा खून

  • १० जानेवारी- इंदिरानगरला भरचौकात खून. संजयनगरला तरुणावर खुनी हल्ला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()