चोरावर मोर,सांगलीत साठेबाज सज्ज; टोळक्‍यांची गोदामे फुल्ल

भरमसाठ दराने जिवनावश्‍यक वस्तु विकण्याचे साठेबाजांचे नियोजन, स्वतंत्र यंत्रणेची गरज
Grain Warehouse
Grain Warehouse
Updated on

मिरज (सांगली) : जिल्ह्यात सुरू झालेल्या संचारबंदीचा गैरफायदा घेण्यासाठी साठेबाजांची टोळी सज्ज झाली आहे. साठेबाजीचा कायदाही असून नसल्यासारखी स्थिती असल्याने संचारबंदीच्या काळात उघडपणे साठेबाजांचे टोळके जीवनावश्‍यक वस्तूंची भरमसाठ दराने विक्री करण्याच्या तयारीत आहे. काळाबाजार करणाऱ्या टोळक्‍यांची गोदामे फुल्ल झाली आहेत. डाळी, साखर, गहु यासह तृणधान्यापासून ते तेल, तिखटा मिठापर्यंत सगळ्या वस्तु ऐन लॉकडॉऊनमध्ये भरमसाठ दराने विकण्याचे या साठेबाजांचे पक्के नियोजन आहे. शासकीय यंत्रणेचे सोयीस्कर दुर्लक्ष आणि ग्राहकांची आगतिकता याचा अचुक लाभ घेत हे साठेबाज भरमासाठ कमाई करण्याच्या तयारीत आहेत.

संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आल्याने खुला व्यापार पूर्ण बंद असणार आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांना जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री सर्व नियम अटी पाळून करावी लागणार आहे. सामान्य नागरिकांनाही सहजपणे किराणा दुकानातील साहित्य खरेदी करता येणार नाही. त्यामुळे याच संधीचा गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने साठेबाजांनी अनेक अत्यावश्‍यक वस्तूंचा साठा करून ठेवला आहे.

संचारबंदीच्या कालावधीत या सर्व जीवनावश्‍यक वस्तूंची महागड्या दराने विक्री करण्यासाठी साठेबाजांची यंत्रणा पुर्णपणे सज्ज झाली आहे. यासाठी साठेबाजांनी शहराऐवजी ग्रामीण भागातील गोदामांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची गोदामे साठेबाजीसाठी वापरली जाणार आहेत. या मालाची चढ-उतार आणि वाहतूक करणा-यांनीही याच साठेबाजांशी भागीदारी केली आहे तर काही वाहतुकदारांनी खासगी सावकारांकडून भरमसाठ व्याजाने कर्जाऊ रक्कम घेऊन या साठेबाजीच्या गोरख धंद्यात आपले नशीब आजमावण्याचे ठरवले आहे.

काही वाहतुकदार आणि मालाची चढ उतार करणाऱ्यांनी साठेबाजांकडुन जादा पैसे वसूल करुन "चोरावर मोर" होण्याचीही किमया साधली आहे. साठेबाजीसाठी गोदामाकडे जाणाऱ्या किंवा गोदामातून बाहेर पडणाऱ्या मालमोटारी पोलिसांनी अडवू नयेत यासाठीचीही योग्य दक्षता साठेबाजांनी घेतली आहे. याशिवाय ग्राहकांचीही मोठ्या प्रमाणात लूटमार होणार आहे.

साठेबाजांचा मोठा आर्थिक फटका आमच्या सर्वसामान्य किरकोळ व्यापारी बांधवांना बसतो. त्यामुळे व्यापारी संघटना आणि किरकोळ विक्रेते व्यापाऱ्यांचा या साठेबाजांना सतत विरोध असतो. ग्राहकांनी साठेबाजीची माहिती आमच्या संघटनेस दिल्यास संघटना निश्‍चितपणे संबंधित साठेबाजाविरुद्ध कठोर भूमिका घेईल.

विराज कोकणे, अध्यक्ष, मिरज व्यापारी असोसिएशन

सर्वसामान्यांच्या संरक्षणासाठी अस्तित्वात असलेला जीवनावश्‍यक वस्तूंचा कायदा कायदा हा अतिशय कडक आहे. त्याची अंमलबजावणी कमी प्रमाणात होत असल्याने तो कायदाच अस्तित्वात नाही असा गैरसमज कोणाही साठेबाजांनी करून घेऊ नये.

- समीर शिंगटे, उपविभागीय दंडाधिकारी, मिरज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.