News From Sangali: सोन्या चांदीचे दुकान फोडून दहा किलो चांदी चोरट्यांनी पळवून नेली

Due to this incident, there is a significant disturbance in the Dafalapur area: डफळापूर येथे मुख्य बाजारपेठेत रविवारी पहाटे २ ते ३ च्या दरम्यान ही घटना घडली.
Theft in the main market
Theft in the main market sakal
Updated on

Jat, Sangali: डफळापूर येथे मुख्य बाजारपेठेतील सोन्या चांदीचे दुकान फोडून दहा किलो चांदी चोरट्यांनी पळवून नेली. त्याची सुमारे पाच लाख किंमत असून रविवारी पहाटे २ ते ३ च्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेमुळे डफळापूरसह परिसरात मोठी खळबळ माजली आहे. याबाबत जत पोलिस ठाण्यात हनमंत भगवान भोसले (डफळापूर, ता. जत) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून घटनास्थळी मिरज उपविभागीय पोलिस अधिकारी प्रनील गिलडा, पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांनी भेट दिली आहे. दोन पथक तयार करून चोरीचा छडा लावण्यासाठी यंत्रणा कार्यरत झाली आहे. चोरीचा तपास करणे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे. रेकी करून ही चोरी केल्याचा संशय व्यक्त होत आहे.

Theft in the main market
IAS Pooja Khedkar: पूजा खेडकरच्या आईचा आणखी एक कारनामा, 2022चा 'तो' व्हिडिओ व्हायरल

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, तालुक्यातील डफळापूर येथे हनमंत भगवान भोसले यांचे नेहा ज्वेलर्स नावाचे सोने चांदीचे दुकान मुख्य बाजारपेठेत विठ्ठल मंदिराशेजारी आहे. सध्या लग्नसराई आणि विविध कार्यक्रमांची रेलचेल असल्याने त्यांनी चांदीचा माल भरला होता. रविवारी पहाटे त्यांचे दुकानाचे मुख्य शेटर, आतील लोखंडी ग्रील आणि सेंट्रल लॉक कटरने तोडून शोकेसमध्ये असणारे तब्बल दहा किलोची चांदी चोरट्यांनी पळविली. यात दीड लाख चांदीचे पैंजण तसेच तोडे, बाळे, मासुळी, जोडवी, बिचवा, कडली या दागिन्यांसह जुनी मोड असा एकूण १० किलो चांदीचा मुद्देमाल चोरट्याने लांबवला आहे.

बाजार पेठेतील फुटेज तपासण्यात येत असून अनोळखी एक जण काही फुटेजमध्ये दिसून आल्याचे सांगण्यात येत आहे. या चोरीचा तपास पोलिस उपनिरीक्षक गायकवाड करत आहेत.

Theft in the main market
Crime News : पतीच्या प्रेयसीविरोधात हिंसाचाराची तक्रार फेटाळली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.