सांगली : जिल्हा बँकेचे ‘सीईओ’ कडू-पाटील यांचा राजीनामा

शिवाजी वाघ यांची होणार नियुक्ती
Sangli District Bank
Sangli District Banksakal
Updated on

सांगली: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जयवंत कडू-पाटील यांनी आज राजीनामा दिला. एकरकमी कर्जफेड योजना, कर्ज निर्लेखित करण्यासह व्याजमाफीचा निर्णय शनिवारी (ता. १९) होणाऱ्या ऑनलाईन सभेत होण्याची शक्यता होती. तत्पूर्वी, ‘सीईओ’ कडू-पाटील यांनी राजीनामा दिल्याने तर्क-वितर्क लढविले जात आहेत. दरम्यान, राज्य शिखर बँकेचे निवृत्त सरव्यवस्थापक शिवाजी वाघ यांची ‘सीईओ’पदी नियुक्ती केली जाईल.

जिल्हा बँकेत शैलेश कोथमिरे प्रशासक असताना कडू-पाटील यांनी चांगले काम केले होते. त्यानंतर त्यांनी दुसरीकडे काम केले. जिल्हा बँक अडचणीत येऊ लागल्याने त्यांना जानेवारी २०२० मध्ये पुन्हा बोलावले. त्यांची मुदत डिसेंबर २०२१ पर्यंत होती. कोरोना, वसुलीसाठी त्यांना मुदतवाढ दिली होती. वर्षभरापूर्वी त्यांना पदावरून हटविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. संचालक मंडळात दोन गट पडल्याने त्यांना राजीनामा न देण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला गेला. काही संचालकांनी त्यांना भर बैठकीतून पळवून नेऊन राजीनामा न देण्यास दबाव टाकला. यातूनच त्यांना मुदतवाढ मिळाली. पण, दुसऱ्या गटाचा त्यांना मोठा विरोध होता.

गेल्या काही दिवसांपासून हा विषय बँक संचालकांच्या ऐरणीवर होता. नवीन सीईओंची नियुक्ती होईपर्यंत कडू-पाटील यांना कामाचे आदेश दिले होते. मात्र, बड्या कर्जदारांची वन टाईम सेटलमेंट, राईट ऑफ यावरून संचालक मंडळात वादंग सुरू आहेत. जिल्ह्याच्या बँकिंग वर्तुळातही याची मोठी चर्चा सुरू असताना सीईओ कडू-पाटील यांनी आज राजीनामा दिला. याबाबत श्री. कडू-पाटील यांना विचारले असता त्यांनीही राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले. बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक हे विधिमंडळाच्या अधिवेशनामुळे मुंबईत आहेत. ते दोन दिवसांत सांगलीत येतील. त्यांच्याशी चर्चा करून श्री. कडू-पाटील पदभार सोडणार आहेत.

दरम्यान, नवे ‘सीईओ’ म्हणून राज्य बॅंकेचे माजी सरव्यवस्थापक वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेड आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतही त्यांनी कार्यकारी संचालक म्हणून काम केले आहे. सीईओ वाघ यांच्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांनी हिरवा कंदील दर्शविला असल्याचे समजते. शनिवारी बँकेची विशेष सभा आहे. या सभेत वाघ यांचा राजीनामा मंजूर केला जाईल व नवे ‘सीईओ’ म्हणून वाघ यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()