Sangli Crime : गांजाची नशा; ॲडिक्शन ते रुग्णालयात ॲडमिशन

जिल्ह्यात रुग्णालयातील रुग्णांची संख्या वाढली
Drug Crime
Drug CrimeSakal
Updated on

सांगली : जिल्ह्यातील जतच्या उमदीपासून ते शिराळ्याच्या वारणावतीपर्यंत गांजा आता सहज उपलब्ध व्हायला लागला आहे. १६ ते २५ वयोगटातील तरुणांचे गांजाच्या आहारी जाणे वाढले आहे. त्यातूनच गंभीर आरोग्य समस्या उद्‍भवल्या असून शेकडो तरुणांवर शासकीय आणि खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

वसंतदादा शासकीय रुग्णालय, भारती हॉस्पिटलसह खासगी रुग्णालयांतील याबाबतीतील वॉर्ड फुल्ल असल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रमाण धोकादायक पातळीवर पोहोचले असल्याच्या वृत्ताला प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. चारुदत्त कुलकर्णी यांनी दुजोरा दिला.

तंबाखू मिळावी इतक्या सहजतेने गांजा मिळतो, याबाबतचे ‘स्टिंग ऑपरेशन’ ‘सकाळ’ने काही वर्षांपूर्वी केले होते. मिरज शहर गांजाबाबत बदनाम झाले होते. आता जिल्ह्यातील अपवाद वगळता एकही गाव नसेल जिथे गांजा मिळत नाही.

तरुणांना गांजा पुरवणारी यंत्रणा तयार झाली आहे. दारूपेक्षा गांजाच्या नशेत तरुणाई अधिक वाहत चालली आहे. यात १६ ते २५ वयोगटातील तरुणांची संख्या मोठी असून त्यातील अनेक आता रुग्णालयात दाखल होऊन जगण्यासाठी संघर्ष करत आहेत.

Drug Crime
Sangli News : 'ज्या' वक्तव्यावरून वाद सुरू आहे तीच वक्तव्ये जर CM, PM वर झाली असती तर, लगेच अटक झाली असती - भारत पाटणकर

गमतीतून वाढते व्यसन...

डॉ. चारुदत्त कुलकर्णी सांगतात, ‘‘व्यसनाधिनतेला तरुण वयात सुरवात होते. व्यसन करणे म्हणजे ‘कूल’ असणे, आपण मोठे झालेले आहोत, थरारक काहीतरी करतोय, या भावनेतून त्याचा आरंभ होतो. प्रारंभी ही नशा खूप गमतीशीर वाटते. गमतीतून नशा वाढत जाते. ‘तो’ आनंद सारखा-सारखा घ्यावासा वाटतो.

छोट्या-छोट्या आनंदाची मातब्बरी वाटेनाशी होते. त्यात संयमाचा पगडा नसेल, तर मग भयंकर वेगाने व्यसन वाढायला लागते. आपल्याकडे बऱ्यापैकी समृद्धी, चंगळवाद वाढला आहे.’’ कुठल्याही ‘ॲडिक्शन’मध्ये ‘डिनायल’ हा भाग मोठा... मान्य न करणे, ही अडचण असते. माझी दारू, तंबाखू नियंत्रणात आहे, असे वाटते. मात्र ते सहजासहजी नियंत्रणात येत नाही.

कालावधी जाईल तसा त्रास वाढायला लागतो. शारीरिक, आर्थिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक दुष्परिणाम जाणवायला लागतो. इतक्या वर्षांच्या सवयीने अन्न-पाण्यासारखेच दारू आणि गांजा गरजेचा वाटू लागतो.

Drug Crime
Sangli Landslide Danger : भूस्खलनचा धोका असल्याने शिराळा येथील शाळा व अंगणवाडी चे स्थलांतर

गमतीचा भाग संपतो अन्...

डॉ. कुलकर्णी म्हणाले, ‘‘गांजा काय अन् दारू काय... सामान्य राहण्यासाठी दारू गरजेची वाटू लागते. सकाळी सहा वाजता दारू दुकानापुढे गर्दी त्यासाठी असते. गमतीचा भाग तिथून संपलेला असतो. तीव्र स्वरुपाचे त्रास सुरू होतात. तगमग सुरू होते. हेरॉईन, गांजाचे ‘विड्रॉल’ तीव्र असतात. त्यांना रुग्णालयातच दाखल करावे लागते.

हात थरथरणे, भास होणे, झोप न लागणे, वात होणे असे त्रास होऊ लागतात. केवळ रुग्णालयात दाखल करून शरीरात भिनलेले व्यसन काढता येते, मात्र मनाला लागलेल्या सवयींचे काय? छोटे-छोटे आनंद कसे घ्यायचे? नाही कसे म्हणायचे, हे महत्त्वाचे. सशक्त पर्याय कुठले, यावर चर्चा व्हायला हवी. अशावेळी मनाची ‘सर्व्हिसिंग’ महत्त्वाची.

गांजाच्या वाढत्या प्रमाणावर नियंत्रण गरजेचे आहे. समाजात आजूबाजूला जी टोळकी दिसताहेत, त्यातील अनेक गांजा ओढत असण्याची शक्यता आहे. ‘वीड’ मारणे, असा शब्द त्याला वापरला जातो.

Drug Crime
Sangli Crime : सांगलीत नामचीन गुंड सचिन टारझन याचा खून, पोलिसांनी एकाला घेतलं ताब्यात

मुलांबाबत सावध राहा

गांजाची समस्या लवकर लक्षात येत नाही. त्याचा वास येत नाही. घरच्यांना लक्षात येत नाही. ज्यावेळी घसरगुंडी व्हायला सुरू झाली की मग कळते. आयुष्यावर परिणाम व्हायला लागतो. शिक्षण, नातेसंबंध, आर्थिक परिणाम दिसायला लागतो.

गांजाने वेडाचा ‘हेम्प इनसाईनिटी’ नावाचा आजार होऊ शकतो. हा झटका गंभीर स्वरुपाचा असतो. सुंद बसणे, भास होणे, कशात रस न वाटणे, असे त्याचे स्वरूप असते. मुलांबाबत पालकांनी सावध राहणे, हाच त्यावर उपाय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.