सांगली : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे उद्यापासून (ता. १) दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने ते जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील आणि विविध ठिकाणी संपर्क कार्यालयांचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. जिल्हाप्रमुख तानाजी सावंत यांनी ही माहिती दिली.
मनसेच्या महासंपर्क अभियानांतर्गत अमित ठाकरे दोन दिवस दौऱ्यावर आहेत. उद्या सायंकाळी ६ ला इस्लामपूर येथे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, तर ७ ला आष्टा शहराध्यक्ष राजकुमार सावळवाडे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल. रात्री ८ ला डिग्रज येथे विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख कृष्णा मोहिते यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होईल. रात्री १० वाजता सांगली शहरात स्वागत करण्यात येईल.
गुरुवारी (ता. २) माधवनगर रस्त्यावरील सर्किट हाऊस येथे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी, विद्यार्थ्यांशी ते संवाद साधतील. दुपारी तीनला सांगली शहर-जिल्हाध्यक्ष दयानंद मलपे व शहर पदाधिकाऱ्यांच्या वतीने पुष्पराज चौक, तर जिल्हा उपप्रमुख संदीप टेंगले यांच्या वतीने अहिल्यादेवी होळकर चौक येथे त्यांचे स्वागत होईल. दुपारी साडेतीनला मिरज येथे मनसे जिल्हा वैद्यकीय मदत कक्षाचे उद्घाटन, साडेचारला तासगाव तालुका मनसे संपर्क कार्यालयास भेट, सायंकाळी ५ ला तासगाव येथे अमोल काळे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन ते करतील.
सायंकाळी ६ ला विटा येथे तालुकाध्यक्ष साजिद आगा यांचे संपर्क कार्यालय व डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तालमीस भेट देतील. सायंकाळी ७ ला टेलिकॉम सेनेचे जिल्हाप्रमुख संग्राम पाटणकर नागज येथे ठाकरे यांचे स्वागत करतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.