Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Islampur Vidhan Sabha Election 2024 : आष्टा येथे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांची प्रचार सभामध्ये गौरव नायकवडी यांचा घणाघात.
Islampur Vidhan Sabha Election 2024
Islampur Vidhan Sabha Election 2024sakal
Updated on

आष्टा : ‘‘भावी मुख्यमंत्री निवडणुकीत पराजित होणार आहेत, अशी चर्चा राज्य पातळीवर चालू आहे,’’ अशी टीका हुतात्मा संकुलाचे नेते गौरव नायकवडी यांनी जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता केली. ते आष्टा येथील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत होते.

गौरव नायकवडी म्हणाले, ‘‘इस्लामपूर मतदारसंघात बदलाच्या दृष्टीने चांगला उठाव झाला आहे. गेली ३५ वर्षे आपल्या खांद्यावर बसलेले हे भूत आता उतरायचे आहे. तुम्ही दबावतंत्राला बळी न पडता निशिकांत पाटील यांना निवडून देऊन बदल घडवून १९७८ ची पुनरावृत्ती करा.

ऊस, रस्ता, पाण्याची अडवणूक होईल, ही भीती मनातून काढून टाकून बदलाच्या लढाईत सामील व्हा. तुमचा ऊस न्यायची जबाबदारी माझी राहील. तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. हुतात्मा संकुल सदैव आपल्या बरोबर राहील.’’

निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, ‘‘इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाकडे पाठ फिरवणाऱ्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. सर्वांना बदल घडवायचा असल्याने सर्व एकदलाने काम करत आहेत. मला या निवडणुकीत आशीर्वाद द्या, येणाऱ्या पाच वर्षांत आष्टा शहराचा चौफेर विकास करेन, हा तुम्हाला मी यानिमित्ताने शब्द देतो.’’

यावेळी सतीश बापट, पोपट भानुसे, प्रवीण माने, अमोल पडळकर, दिलीप मोरे, नंदकिशोर आटूगडे, नीलेश कोळी, दयानंद सुजातक, राकेश आटूगडे, संदीप गायकवाड, साजन अवघडे, उदय कवठेकर, उमेश घोरपडे, अमोल पडळकर, दिलीप कुरणे, अर्चना माळी, शोभा हालुंडे आदी प्रमुख उपस्थित होते.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.