Sangli Eyes Infection News : जत, मिरज, वाळव्यात डोळ्यांची साथ; तालुक्यांत रुग्णसंख्या अधिक

साथीला रोखण्यासाठी शाळांमधून विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात येत आहे.
Eyes Infection
Eyes Infectionesakal
Updated on

सांगली - जिल्ह्याच्या ग्रामीण भागात डोळ्यांची साथ सुरू असून जत, मिरज आणि वाळवा तालुक्यांत रुग्णसंख्या अधिक आहे. त्यामुळे या साथीला रोखण्यासाठी शाळांमधून विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात येत आहे.

पावसाळ्यात विषाणूंच्या संसर्गामुळे डोळ्यांची साथ येण्याचे प्रमाण वाढते. राज्यात यंदा ही साथ जोरात पसरली आहे. त्यामुळे आरोग्य विभागही साथ रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात आठशे जणांना डोळ्यांची लागण झाली आहे.

Eyes Infection
Sangli News : ‘ओबीसी’साठी मोदी ग्रामीण आवास घरकुल योजना

यापैकी २२० जण बरे झाले आहेत, तर ५८० जणांवर उपचार सुरू आहेत. डोळ्यांची साथ रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाच्या सहकार्याने शाळांमधून विद्यार्थ्यांना डोळ्यांची साथ येण्याची लक्षणे आणि डोळे आल्यावर काय करावे, याबाबत जागृती करण्यात येत आहे.

Eyes Infection
Sangli : डॉ. आंबेडकर कमान वाद : बेडगमध्ये जाऊन चौकशी समितीची पाहणी, वादावर लवकरच निघणार तोडगा?

जिल्ह्यात जत, वाळवा आणि मिरज या तीन तालुक्यांमध्ये अधिक संख्येने रुग्ण आढळले आहेत. जतमध्ये १४४, मिरजेत २४७ आणि वाळव्यात १३३ जणांना याची लागण झाली आहे. पलूसमध्ये अवघ्या तिघांना डोळ्यांची लागण झाली आहे. आटपाडी, कडेगाव आणि पलूस तालुक्यात ही साथ आटोक्यात आहे.

Eyes Infection
Sangli News : डाॅ. आंबेडकरांच्या नावाची कमान पाडणाऱ्या दोषींवर त्वरित कारवाई करा; बेडग ग्रामस्थांसह दलित समाज आक्रमक

जिल्ह्यात ग्रामीण भागात डोळ्यांचे साथीचे रुग्ण आढळत आहेत. मात्र साथीचा फार मोठा जोर नाही. परंतु साथीबाबत शाळांमधून विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ७९९ जणांना या आजाराची लागण झाली असून त्यापैकी २२० जण बरे झाले आहेत, तर ५७९ जणांवर उपचार सुरू आहेत. उपचारांसाठी औषधेही उपलब्ध आहेत.

डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सांगली

महापालिका क्षेत्रात ८३१ रूग्ण

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात आतापर्यंत ८३१ जणांना डोळ्यांची लागण झाली आहे. ३४४ रुग्ण बरे झाले आहेत, तर ४८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महापालिका क्षेत्रात ‘आशां’च्या माध्यमातून ‘घर टू घर’ सर्वेक्षण करण्यात येत आहे. प्रभागनिहाय पथके नेमण्यात आली आहेत. त्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. औषधेही उपलब्ध आहेत, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.