वारणाकाठ हादरलाय! शिराळा तालुक्यातील सहा गावांना भूस्खलनाचा धोका

ढगफुटी, अतिवृष्टीचा फटका ,भूस्खलनाचा धोकाही अधिक
sangli Flood
sangli Floodsakal
Updated on

सांगली : यंदा महापुराच्या मुळाशी जाताना अलमट्टी-कोयना (Almatti-Koyna Dam) धरणांतील विसर्ग; नदीपात्रातील अतिक्रमणे; अतिवृष्टी यावर खूप चर्चा झाली. परंतु, वारणा नदीकाठाला बसलेला हादरा, नदीचे २०१९ च्या तुलनेत तब्बल चार फुटांनी वाढलेले पाणी फार चर्चेत आले नाही. चांदोली धरण ( Chandoli Dam) क्षेत्राच्या बाहेरची ढगफुटी आणि ओढ्या-नाल्यांनी दिलेला प्रचंड तडाखा यामुळे वारणाकाठ हादरून गेला आहे. त्यात सहा गावांना असलेला भूस्खलनाचा धोका गंभीर वळणावर आहे. राज्य शासनाने कृष्णाकाठापेक्षा अधिक गांभीर्याने वारणाकाठी काम केले पाहिजे, अशी तेथील लोकभावना आहे.

Summary

इथला सामान्य माणूस पुरता हादरून गेला आहे. मातीची घरे पडली आहेत, उसाची चिपाडे झाली आहेत. नुकसानीपेक्षा निसर्गाच्या या रौद्ररूपाने लोकांना घाबरवून टाकले आहे.

२०१९ ला कृष्णा नदीची सांगलीतील आयर्विन पुलाजवळील पाणी पातळी ५७.८ फुटांवर होती. ती यंदा ५५ फूट राहिली. २.८ फूट इतके पाणी कमी होते. वारणेची परिस्थिती वेगळी होती. यावेळी तेथे चार फुटांनी पाणी अधिक होते, दुधगावपर्यंत त्याचा दाह अधिक जाणवत होता. त्यामुळे वारणाकाठचे नुकसान हे २०१९ ला झालेल्या नुकसानीच्या तुलनेत अधिक आहे. शिवाय, यावेळी वारणा नदीपेक्षा मोठे ओढे, नाले यांनी दाखवलेले रौद्ररूप शिराळा, वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांना धडकी भरवणारे ठरले आहे.इथला सामान्य माणूस पुरता हादरून गेला आहे. मातीची घरे पडली आहेत, उसाची चिपाडे झाली आहेत. नुकसानीपेक्षा निसर्गाच्या या रौद्ररूपाने लोकांना घाबरवून टाकले आहे.

केवळ वारणा नदीकाठालाच दणका बसलाय, असे नाही. शिराळा तालुक्यातील ओढे, नाले, वगळींनीही शेती कापली आहे. प्रचंड नुकसान झाले आहे. ते दुर्लक्षित करून चालणार नाही, असे मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितले. पालकमंत्री जयंत पाटील यांनी सूचना दिल्यानंतर त्याचेही पंचनामे सुरू झाले आहेत.

- मानसिंगराव नाईक, आमदार, शिराळा

दोन गावांचे पुनर्वसन

शिराळा तालुक्यातील सहा गावांना भूस्खलनाचा धोका आहे. पैकी फाष्टेवस्ती आणि कोकणेवाडी ही दोन गावे स्थलांतरित करण्यात आली होती. त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतल्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी सांगितले. अन्य चार गावांबाबत सविस्तर अहवाल बनवून निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पठारालाही फटका

गुढे, पाचगणीसह खुंदलापूर, जाधववाडी, मिरुखेवाडी, खोतवाडी, बेर्डेवाडी, सावंतवाडी, बांबरवाडी, मणदूर धनगरवाडा, येसलेवाडी, भाडुगळेवाडी, कोकणेवाडी, भाष्टेवस्ती, भाष्टेवाडी, मानेवाडी आदी पठारावरील गावांनाही प्रचंड फटका बसला आहे. ही गावे नदीकाठी नसली तरी ढगफुटी, प्रचंड वेगवान वारे यांनी ती त्रासली आहेत.

sangli Flood
विचलित झालेल्या हत्तींना डिवचणे धोकादायक

...म्हणून कृष्णा तुंबली

कृष्णा नदीचे पाणी आवश्‍यक गतीने ओसरत का नाही, याचे उत्तर वारणा नदीच्या अतिप्रचंड प्रवाहात दडल्याचे स्पष्ट होत आहे. कारण, कृष्णेच्या पुराला कऱ्हाडपासून वेगाने उतार होता; मात्र सांगलीत येईपर्यंत तो अतिसंथ झाला होता. वारणेचा प्रचंड प्रवाह कृष्णेला मागे सारत होता. त्याचा परिणाम वारणाकाठच्या दुधगाव, कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी परिसराला भोगावा लागला. सांगलीतील पाणी पातळीच्या अंदाजावर या गावांनी निर्णय घेतले असते, तर ती चूक ठरली असती.

दिवसात १६ इंच पाऊस

कोयना धरण क्षेत्रातील पावसावर खूप बोलले गेले, लिहिले गेले. वारणाकाठच्या ढगफुटी, अतिवृष्टीकडे त्यात कानाडोळा झाला. वास्तविक, २३ जुलै रोजी वारणा धरणाच्या बाहेर तब्बल १६ इंच म्हणजे ४०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला. ही ढगफुटीसारखीच स्थिती होती. धरणाच्या क्षेत्रात सुमारे ४० ते ५० किलोमीटरच्या परिघात झालेल्या पावसाची गणतीच झाली आहे. तो पाऊसही सुमारे २० इंचाहून अधिक असावा, असा अंदाज आहे. हे सारे पाणी घेऊन वाहताना वारणा नदीची फूग इतकी वाढली, की २०१९ च्या तुलनेत पाणी पातळी तब्बल चार फुटांनी वाढली. शिराळा तालुक्यात मणदूर ते राष्ट्रीय महामार्गावरील पुलापर्यंत असंख्य छोटे ओढे, वगळी आहेत. शिवाय, मोरणा नदीच्या अतिवेगवान पाण्यानेही दणका दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.