Sangli Flood : लष्कराच्या जवानांनी पुराच्या पाण्यात उड्या घेतल्या अन् वाचवले अनेकांचे प्राण

कर्नाळ रस्त्यासह परिसरात पुराचे (Sangli Flood) पाणी आले आहे. त्याच परिसरातील एका घराभोवती पाण्याने वेढा दिला होता.
Indian Jawan
Indian Jawanesakal
Updated on

सांगली : कर्नाळ रस्त्यासह परिसरात पुराचे (Sangli Flood) पाणी आले आहे. त्याच परिसरातील एका घराभोवती पाण्याने वेढा दिला होता. जिवाच्या आकांताने लोक मदतीच्या प्रतीक्षेत होते. तेवढ्यात लष्कराचे बोट त्याठिकाणी आली. क्षणात पाच जवानांनी (Indian Jawan) पाण्यात उड्या घेतल्या. काही मिनिटातच तेथील नागरिकांना सुरक्षितपणे बोटीत आणले आणि सुरक्षितस्थळी नेले.

काल सायंकाळी पाचच्या सुमारास लष्कराचं हे प्रात्यक्षिक यशस्वी झालं. यावेळी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी, एनडीआरएफचे पथक, अपर पोलिस अधीक्षक रितू खोखर, उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्यासह फौजफाटा होता. लष्कराच्या त्या मदतकार्याचा थरार तमाम सांगलीकरांनी पाहिला आणि संभाव्य पूरपरिस्थितीत लष्कर सांगलीकरांच्या सोबत असल्याची भावना यानिमित्ताने समोर आली.

Indian Jawan
Kolhapur Flood : पावसाचा जोर कमी असला, तरी महापुराची स्थिती गंभीरच! पंचगंगेची पाणीपातळी किती फुटांवर?

कृष्णा नदीच्या पातळीत गेल्या दोन दिवसात सातत्याने वाढ होत आहे. कृष्णेची पाणीपातळी आज चाळीस फुटांवर पोहोचली आहे. इशारा पातळी ओलांडल्यानंतर सांगलीकरांना धडकी भरली आहे. पूरपरिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. एनडीआरएफची पथकेही सांगलीत दाखल झाली आहेत. मात्र, पाणीपातळी सातत्याने वाढत असल्याने लष्कराला काल पाचारण करण्यात आले.

Indian Jawan
Indian Jawanesakal

लष्कराच्या दोन तुकड्या सांगलीत दाखल झाल्या आहेत. लष्कराच्या जवानांनी आज सकाळी कर्नाळ रस्त्यावर बोटीद्वारे साऱ्या परिसराची पाहणी केली. प्रत्यक्ष नदीपात्रातही त्यांनी पाहणी केली. त्यानंतर दुपारी चार वाजता पुन्हा जवान कर्नाळ रस्त्यावर दाखल झाले. अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार त्यांनी तातडीने बोटी उतरवल्या. पाच जवान बोटीत बसले. मार्ग दाखवणाऱ्यांचा इशारा झाला आणि बोटी पुढे निघाल्या. त्यावेळी त्यांनी कर्नाळ रस्त्यावरील एका घराजवळ गेले.

Indian Jawan
Sangli Flood : कृष्णामाई, आम्हास माफ कर..! 'त्यांनी' निसर्ग ओरबडला अन् नदीकाठ...

त्याठिकाणी घराभोवती पाण्याचा वेढा असल्याने तातडीने पाण्यात उड्या घेतल्या. घरासमोर गेले आणि प्रात्यक्षिक यशस्वी करून दाखवले. त्यानंतर पुन्हा लष्काराचे जवान कर्नाळ रस्त्यावर आले. लष्कराच्या जवानाचा तो थरार साऱ्या सांगलीकरांना पाहिला. आणि आपल्याला सुरक्षितस्थळी नेण्यासाठी लष्कर मदतीसाठी येईल, अशी भावना मनात घेऊन भीतीच्या छायेत असलेले लोक परतले. यावेळी शहरचे निरीक्षक संजय मोरे, ग्रामीणचे राजेश रामाघरे, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, वाहतूकचे मुकुंद कुलकर्णी, मोटार वाहन निरीक्षक आकाश गालिंदे यांच्यासह पथके तैनात होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.