Ganesh Chaturthi : दोन शतकांची परंपरा लाभलेल्या सांगली संस्थानच्या 'चोर गणपती'चं आगमन; काय आहे खासियत?

चोर गणपतीची प्रतिष्ठापना होताच सांगली परिसरात वातावरण गणेशमय होऊन गेलंय.
Sangli Ganeshotsav Chor Ganapati
Sangli Ganeshotsav Chor Ganapatiesakal
Updated on
Summary

प्रतिपदेला पहाटे पाच वाजता पारंपरिक पद्धतीने चोर गणपतीची प्रतिष्ठापना होते. साडेतीन फुटांच्या दोन मूर्तींची प्रतिष्ठापना होते.

सांगली : दोन शतकांची परंपरा लाभलेल्या सांगलीच्या पंचायतन गणेशोत्सवाचा एक भाग असलेल्या चोर गणपतीची (Chor Ganapati) काल प्रतिष्ठापना झाली. यानिमित्ताने संस्थानच्या गणेशोत्सवास आजपासून प्रारंभ झाला. महापूजेनंतर त्यांना निरोप दिला जाणार आहे.

मोठ्या भक्तिभावाने पूजा-अर्चा करण्यात आली. चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन (Chintamanrao Appasaheb Patwardhan) यांनी ही चोर गणपती प्रतिष्ठापनेची परंपरा सुरू केली. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला कागदाच्या लगद्यापासून बनविलेल्या या पर्यावरणपूरक चोर गणपतीचे अत्यंत गुपचूपपणे मंदिरात आगमन होते.

Sangli Ganeshotsav Chor Ganapati
गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी! 'टोलमाफी'बाबत सरकारनं घेतला मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी जारी केला आदेश

संस्थान गणेशोत्सवाचा प्रतिवर्षी शाही माहोल असतो. प्रतिपदेला म्हणजे चतुर्थीच्या तीन दिवस आधी प्रतिष्ठापना होते. चोर गणपती केव्हा आला अन्‌ गेला, याची भाविकांना माहितीही होत नाही. म्हणून विघ्नहर्त्याला ‘चोर गणपती’ म्हणण्याची प्रथा रूढ आहे. गणपती मंदिरात पहाटे साधेपणाने चोर गणपतीची प्रतिष्ठापना पुजारी व ट्रस्ट पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली.

Sangli Ganeshotsav Chor Ganapati
पुसेसावळी दंगलीत ठार झालेल्या नूरहसन शिकलगारच्या कुटुंबीयांची पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली भेट; म्हणाले, दंगल पूर्वनियोजित की..

ही प्रतिष्ठापना झाल्यानंतरच प्रतिवर्षी दरबार हॉलमध्ये संस्थानचा उत्सव सुरू होतो. चोर गणपतीची प्रतिष्ठापना होताच सांगली व परिसरात वातावरण गणेशमय होऊन गेले. चोर गणपती पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. महापूजा, प्रसाद असा कार्यक्रम असून, चोर गणपतीला गुपचूप निरोप दिला जाणार आहे.

Sangli Ganeshotsav Chor Ganapati
Shambhuraj Desai : गणेशोत्सवाबाबत पालकमंत्र्यांनी पोलिसांना दिले महत्त्वाचे आदेश; देसाई म्हणाले, गालबोट लागेल असं..

पर्यावरणपूरक मूर्ती

प्रतिपदेला पहाटे पाच वाजता पारंपरिक पद्धतीने चोर गणपतीची प्रतिष्ठापना होते. साडेतीन फुटांच्या दोन मूर्तींची प्रतिष्ठापना होते. दोनशे वर्षांपूर्वी कागदाच्या लगद्यापासून पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यात आली. तेव्हापासून ती तशीच आहे. केवळ रंगरंगोटी केली जाते. मुख्य मूर्तीच्या डाव्या-उजव्या बाजूला दोन्हीही मूर्ती बसवण्यात येतात. भाविकांना हात लावून दर्शन घेता येते. उत्सवानंतर मूर्ती सुरक्षितस्थळी ठेवण्यात येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.