Sangli Grapes : सांगलीच्या द्राक्षांची चव 24 देशांनी चाखली; निर्यात तब्बल 14 हजार टनावर

दशकभरापूर्वी जिल्ह्यातील शेकडो कंटेनर समुद्रातून परत पाठवण्यात आले होते.
Sangli Grapes
Sangli Grapesesakal
Updated on
Summary

'गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा हंगाम चांगला होता. विदेशातील ग्राहकांनी इकडची द्राक्ष आवडल्याचा निरोप पाठवला आहे.'

सांगली : नैसर्गिक संकटांनी (Natural Disaster) कितीही फेर धरला, तरी त्यातून वाट काढत जिल्ह्यातील द्राक्ष (Grape) उत्पादक नेटाने लढत आहेत. या वर्षी जिल्ह्यातून तब्बल १४ हजार ७४६ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. एक हजार ८० कंटनेर द्राक्ष जगभरात पाठवण्यात आली आहेत. तब्बल २४ देशांतील ग्राहकांनी सांगलीच्या द्राक्षाची चव चाखली आहे. रसायनमुक्त द्राक्ष उत्पादनाचा जिल्ह्यातील टक्का वाढतोय, हेही या आकडेवारीतून समोर येते.

द्राक्ष उत्पादनात जिल्ह्याने आघाडी घेतली खरी, मात्र जगाच्या बाजारात स्वतःला सिद्ध करताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बरेच कष्ट करावे लागले. दशकभरापूर्वी जिल्ह्यातील शेकडो कंटेनर समुद्रातून परत पाठवण्यात आले होते. ती नाचक्की पचवून शेतकरी नव्याने उभा राहिला. द्राक्षातील दोष दूर करून कमीत कमी रसायनांचा वापर करून निर्यातीला योग्य द्राक्षनिर्मितीत त्यांना यश मिळवले आणि यावर्षी तब्बल २४ देशांमध्ये ही द्राक्ष पोहोचली आहेत. त्यात युरोप, अमेरिका (America), ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, आशिया खंडातील प्रमुख देशांचा समावेश आहे.

पळशी (ता. खानापूर) येथील द्राक्ष बागायतदार अमित गुरव म्हणाले, ‘‘गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा हंगाम चांगला होता. विदेशातील ग्राहकांनी इकडची द्राक्ष आवडल्याचा निरोप पाठवला आहे. सूर्यप्रकाश चांगला राहिल्याने गोडी अधिक होती. गर चांगला भरला. शेवटच्या टप्प्यात उष्णता अधिक आहे. उर्वरित निर्यातक्षम द्राक्ष टिकवण्याचे आव्हान असेल. खत आणि औषधांच्या दराच्या तुलनेत निर्यातीतून मिळालेला दर कमीच आहे. उत्पादनखर्च आणि उत्पन्न यातील तफावत कमी झाली पाहिजे.’’

एक महिना निर्यातीवर परिणाम..

या वर्षी हंगामाच्या मध्यावरच जागतिक वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या सुएझ कालव्यातील जहाजांच्या वाहतुकीचा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यामुळे निर्यातीला आडकाठी आली होती. त्याचा परिणाम एक महिना निर्यातीवर परिणाम झाला. त्यानंतर प्रश्‍न सुटला आणि पुन्हा निर्यात सुरू झाली.

...येथे झाली निर्यात

देश कंटेनर निर्यात (टनामध्ये)

  • ऑस्ट्रिया ५ ६९.१०

  • कॅनडा १९ ३२४.१३

  • चीन ९५ ११५९.४८

  • क्रोएशिया १ १३

  • डेन्मार्क १८ २२४.६४

  • जर्मनी ८ १०८.०३

  • हाँगकाँग ६ ७६.५०

  • आर्यलॅंड ७ ९७.४४

  • इटली ५ ६८.५२

  • कुवेत १ १८

  • मलेशिया १९ २४६.९०

  • नेदरलँड ४०२ ५२९८.५०

  • नॉर्वे ३२ ३८४

  • ओमान ७ १३१.०६

  • कतार १ १३.२५

  • रोमानिया ११ १५०

  • रशिया १६ ३१२.९०

  • सौदी अरेबिया ८० १२३५.९५

  • सिंगापूर ३ ३६.४८

  • स्पेन ८ १०२.९६

  • तैवान १ १२.४८

  • थायलंड ८ १०२.२३

  • संयुक्त अरब अमिरात २३८ ३३५४.८३

  • युनाटेड किंगडम ८९ १२०६.४७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.