Snakes in Flood Waters : पुरामुळे घरात येणाऱ्या सापांबाबत अशी घ्या दक्षता; साप चावला तर 'हे' आधी करा

या पुरामुळे घरा-दारात पाण्यासमवेत विस्थापित झालेले सापासह अन्य वन्यजीव आसऱ्याला येऊ शकतात.
Sangli Kolhapur flood Snakes
Sangli Kolhapur flood Snakesesakal
Updated on

सध्या कृष्णा-वारणा नदीकाठ पुराच्या सावटाखाली आहे. या पुरामुळे घरा-दारात पाण्यासमवेत विस्थापित झालेले सापासह अन्य वन्यजीव आसऱ्याला येऊ शकतात. पाण्यामुळे या काळात साप सैरभैर होतात. प्रवाहासह ते घर आणि परसबागेत येतात. अशावेळी कोणती दक्षता घ्यावी, याविषयी...

-अमोल जाधव वन्यजीव अभ्यासक, नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटी, सांगली

पावसाळ्याची दक्षता

● एखादा वन्यजीव आढळल्यास घाबरून न जाता शांत राहावे आणि त्याच्यापासून थोडे अंतर ठेवावे. सापांपासून किमान १५-२० फूट.

● त्यांना सुरक्षित पकडून नेण्यासाठी अनुभवी आणि प्रामाणिक प्राणिप्रेमी किंवा वनविभाग कर्मचाऱ्यांना बोलवावे. ते येईपर्यंत दूरून त्या जीवावर लक्ष ठेवावे. त्याला अजिबात डिवचू नये.

● कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतः त्यांना हाताळण्याचा प्रयत्न करू नये. ते घाबरलेले असल्याने चावा घेऊ शकतात.

Sangli Kolhapur flood Snakes
Kolhapur Flood : पावसाचा जोर कमी असला, तरी महापुराची स्थिती गंभीरच! पंचगंगेची पाणीपातळी किती फुटांवर?

साप घरात येऊ नये, यासाठी....

● घराजवळ कचरा साठू देऊ नये. कचरा असेल तर उंदीर येतील. उंदीर आले तर साप त्यांना शोधत येतील.

● घर वारंवार स्वच्छ केलं पाहिजे. घरांमध्ये काही छिद्रं, बिळं असतील तर ती बंद करावीत. घरातील सांडपाण्याचे पाईप जाळीसारख्या उपायांनी झाका. रात्री घराभोवती प्रकाश ठेवा. घरांच्या बाहेर स्नानगृह किंवा स्वच्छतागृह असल्यास ते स्वच्छ आणि चांगले प्रकाशमान ठेवा.

Sangli Kolhapur flood Snakes
Sangli Flood : कृष्णामाई, आम्हास माफ कर..! 'त्यांनी' निसर्ग ओरबडला अन् नदीकाठ...
Sangli Kolhapur flood Snakes
Sangli Kolhapur flood Snakesesakal

साप चावला तर....

  • काही लोक सर्पदंशाभोवती घट्ट बांधतात आणि भाग कापतात. हे टाळले पाहिजे. तसेच डॉक्टरांना तो चावा घेणारा साप दाखवावा लागेल, असे समजून साप मारण्यात वेळ वाया घालवतात.

  • हे देखील टाळले पाहिजे. लवकरात लवकर दवाखान्यात जा. बऱ्याचदा बिनविषारी निरुपद्रवी साप चावलेला असतो. मात्र सर्पदंशामुळे आपण मरणार आहोत, असा विनाकारण विचार केल्यावर रक्तस्त्राव वाढतो. त्यामुळे मृत्यू होतो.

  • त्यामुळे आधी भीती टाळा, घाबरू नका. जवळच्या व्यक्तीला साप चावला तरी तो घाबरू नये, याची आपण काळजी घ्यावी.

Sangli Kolhapur flood Snakes
Sangli Flood : लष्कराच्या जवानांनी पुराच्या पाण्यात उड्या घेतल्या अन् वाचवले अनेकांचे प्राण

पुराचे पाणी मागे हटल्यावर...

  1. सर्वांत आधी पायात गमबूट, पूर्ण लांबीचे कपडे घालून किमान दोन अनुभवी व्यक्तींनी घरात प्रवेश करावा. सोबत चांगला प्रखर टॉर्च, लांब काठी असावी.

  2. घरातील सर्व कोपरे, खिडक्या-दरवाजांच्या मागे, कपाटाच्या खाली, मागे आणि आतमध्ये, छताला कौले / पत्रा असेल तर त्याच्या खाली, तुळ्या, भिंतीच्या फटी, बिळे असल्यास नीट निरखून, तपासून पाहावे. साप सरपटत गेलेल्या खुणा, फुत्करलेले आवाज येतात का, हे नीट पाहावे. घरातील भिजलेले सामान बाहेर काढताना त्या वस्तू लगेच हाताळू नये. त्यामध्ये काही लपलेले नाही ना, हे आधी पाहावे.

  3. समान घेऊन घरात जाताना आधी ते सामान लांब काठीने हलवून नीट निरखून घ्यावे आणि नंतर उचलून लावावे. साप आढळल्यास प्राणिमात्रांना किंवा वनविभागाच्या १९२६ या हेल्पलाईनला कळवावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()