Sangli Landslide Danger : भूस्खलनचा धोका असल्याने शिराळा येथील शाळा व अंगणवाडी चे स्थलांतर

सोनवडे पैकी खोतवाडी येथील जिल्हा परिषद शाळा ही डोंगरपायथ्याशी असल्यामुळे सदर शाळेला भूस्खलनचा धोका.
ZP School Khotwadi
ZP School Khotwadisakal
Updated on

शिराळा - सोनवडे पैकी खोतवाडी येथील जिल्हा परिषद शाळा ही डोंगरपायथ्याशी असल्यामुळे सदर शाळेला भूस्खलनचा धोका असल्याचे लक्षात आल्याने शाळा खोतवाडी येथील मंदिरात तर अंगणवाडी खाजगी घरात स्थलांतरित केली आहे.

याबाबत गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनी शाळेला भेट देऊन मुख्याध्यापकांशी चर्चा करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या सर्वतोपरी उपाययोजना करणेबाबत मुख्याध्यापकांना सूचना केल्या आहेत. त्यानंतर गटविकास अधिकारी यांनी जिल्हा परिषद शाळा चरण नंबर दोन येथील धोकादायक वर्ग खोल्यांना भेट देऊन पाहणी केली.

सदर वर्गखोल्या निर्लेखन करण्याचा प्रस्ताव तात्काळ जिल्हा परिषदेकडे सादर करण्याच्या सूचना त्यांनी बांधकाम व शिक्षण विभागात दिल्या आहेत. सदर शाळेची मुले अन्य वर्ग खोल्यात बसत असली तरी त्या खोल्या सुद्धा दुरुस्ती करणे आवश्यक आहे. याबाबत प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा करून पुढील उपाययोजना केली जाईल असे राऊत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.