सांगली : जिल्ह्यात आज महालसीकरण अभियान

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी; ६०० केंद्रावर १.५० लाख लसीकरणाचे नियोजन
sangli
sanglisakal
Updated on

सांगली : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट टाळण्यासाठी आणि जर आलीच तर तिचा प्रभाव कमी करण्यासाठी जिल्ह्यात उद्या ( ता. १५) १८ वर्षावरील सर्व नागरिकांसाठी महालसीकरण अभियान आयोजित करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत सुमारे १ लाख ५० हजार इतके कोरोना लसीचे डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे लसीकरण सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

sangli
वीजबील थकबाकीची वसुली न झाल्यास राज्य अंधारात जाईल - नितिन राऊत

जिल्हाधिकारी कार्यालयात महालसीकरण अभियान तयारी आढावा बैठक दूरदृश्यप्रणालीव्दारे जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल आंबोळे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील, जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत मुख्याधिकारी, ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी दूरदृश्यप्रणालीव्दारे उपस्थित होते.

sangli
हातगेघर धरणग्रस्तांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीस गती

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, महालसीकरण अभियानाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यात ६०० लसीकरण केंद्रे उभारली आहेत. यामध्ये महानगरपालिका क्षेत्रात १९४ लसीकरण केंद्रे, ग्रामीण भागात ३५०, शहरी भागात ५६ लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. जिल्ह्यातील इस्लामपूर, विटा, जत यासारख्या मोठ्या शहरांमध्ये आवश्यकतेनुसार लसीकरण केंद्रे वाढविण्यात यावीत. लसीकरणाठी आवश्यक असणारा सर्व स्टाफ, डेटा एन्ट्री ऑपरेटर, आशा वर्कर्स, एनएनएम, जीएनएम, नर्सेस, वैद्यकिय अधिकारी, लसटोचक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांना योग्य त्या सूचना संबंधित यंत्रणेव्दारे देण्यात आल्या आहेत. लसीकरणासाठी जिल्ह्यात सद्यस्थितीत १.७० लाख डोसेस उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.