latest Sangli News: कवठेमहांकाळ एसटी आगारातील सहायक जावेद अल्लाबक्ष नगारजी (वय ३८, जत) या एसटी कर्मचाऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली. आगार व्यवस्थापकांनी बदलीचा अर्ज अडवून ठेवल्याने आत्महत्या करीत असल्याचे जावेद नगारजी यांनी जिल्हा नियंत्रकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. याप्रकरणी संबंधित एसटी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.