सांगली : चोरीच्या दुचाकींचा‘मॉडीफाय’ फंडा

जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण गेल्या काही महिन्यांपासून वाढले आहे.
जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण गेल्या काही महिन्यांपासून वाढले आहे.
जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण गेल्या काही महिन्यांपासून वाढले आहे.sakal
Updated on

सांगली: चोरीच्या दुचाकीचा तपास करण्याचे जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यातील तपास अधिकाऱ्यासमोर आव्हान आहे. तर, दुसरीकडे चोरीच्या काही दुचाकी ‘मॉडीफाय’ करून वापरात आणल्या जात आहेत. ‘मॉडीफाय’ केलेल्या दुचाकी नव्‍याकोऱ्या दिसत असल्यामुळे त्याची तपासणी होत नाही. वास्तविक ‘मॉडीफाय’ दुचाकीची नंबरप्लेट व चेसी नंबर, इंजिन नंबर याची पडताळणी केल्यास दुचाकीचा इतिहास समोर येईल.

जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण गेल्या काही महिन्यांपासून वाढले आहे. किमान दोन तरी दुचाकी दररोज लांबवल्या जातात. चोरीच्या दुचाकी अन्य जिल्ह्यात किंवा राज्यात जाऊन विकल्या जातात. बऱ्याचदा दुचाकीचे सुटे भाग करून त्याची विक्री होते. दुचाकी चोरीचे प्रकार आणि चोऱ्या उघडकीस येण्याचे प्रमाण पाहिले तर त्यात मोठी तफावत आहे. त्यामुळे एवढ्या चोरीच्या दुचाकी जातात तरी कोठे? असा प्रश्‍न पडतो.

सध्या युवा वर्गामध्ये जुन्या दुचाकीला नवी कोरी बनवून ती वापरात आणण्याचे ‘फॅड’ आहे. त्यासाठी १५ ते २० हजार रुपयांपर्यंत खर्चही केला जातो. जुनी दुचाकी ‘मॉडीफाय’ करताना अन्य दुचाकींचे सुटे भाग वापरून त्याच्या मूळ आकारात बदल केला जातो. पेट्रोल टाकी, मडगार्ड, हेडलाईट, फायबरचे पार्ट हे वेगवेगळे लावून ‘लूक’ बदलला जातो. जुनी दुचाकी नसेल, तर बऱ्याचदा चोरीच्या गुन्ह्यातील दुचाकीचा मूळ साठा वापरला जातो. त्यावर इतर दुचाकींचे पार्ट बसवून आकर्षक बनवली जाते. त्यावर मूळ नंबरप्लेट किंवा दुसरीच कोणती तरी नंबरप्लेट बसवली जाते. चोरीच्या दुचाकी सहजपणे लपवण्यासाठी त्या ‘मॉडीफाय’ करण्याचा फंडा शोधून काढला आहे. अवघ्या काही हजारांत दुचाकीत बदल करून चोरी पचवली जाते. त्यामुळे ‘मॉडीफाय’ दुचाकी खरोखरच नियमानुसार बनवली आहे काय? याचा तपास करून कारवाई करण्याची गरज आहे.

पडताळणी यंत्रणाच नाही

आज शहरात बऱ्याच ‘मॉडीफाय’ दुचाकी पळताना दिसतात. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मूळ दुचाकी कोणती हेच लक्षात येत नाही. अशा बऱ्याच दुचाकींचा चेस नंबर गायब झालेला असतो. तसेच ही दुचाकी रस्त्यावर फिरताना नवी कोरी असल्याचे पाहून तसेच नंबरप्लेट नियमाप्रमाणे असेल, तर वाहतूक पोलिसही अडवत नाहीत. जरी पोलिसांनी अडवले, तर वाहन परवानाच बघितला जातो. तो असेल तर सोडून दिले जाते. त्यामुळे ‘मॉडीफाय’ दुचाकी चोरीची असली तरी त्याची पडताळणी करणारी यंत्रणाच नाही.

मोहीम हवी

चोरीच्या दुचाकींचा नेमका प्रवास कोणत्या दिशेने जातो हे पोलिसांसमोर आव्हानच आहे. त्यापैकी एक मार्ग ‘मॉडीफाय’ करण्याकडे जात असतो. त्यामुळे अशा दुचाकीच्या नंबरप्लेट, इंजिन नंबर, चेसी नंबरची तपासणी केल्यास काही गुन्हे उघडकीस येतील.

कोणत्याही कंपनीच्या गाडीच्या मूळ रूपामध्ये बेकायदेशीरपणे बदल करता येत नाही. अशा प्रकारचा बदल करायचा असेल, तर आरटीओ कार्यालयाकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. विनापरवाना दुचाकीमध्ये बेकायदेशीर बदल केल्याचे आढळल्यास कारवाई केली जाईल.

- विलास कांबळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.