सांगली : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १ लाख २१ हजर ९२ वाहनचालकांकडून ९ कोटी ३५ लाख ९१ हजार २५० रुपयांचा दंड प्रलंबित आहे. हा दंड भरण्यासाठी १२ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. मुदतीत दंड न भरल्यास न्यायालयात खटले दाखल केले जाणार आहेत. वाहतूक नियंत्रण शाखेच्या सहायक निरीक्षक प्रज्ञा देशमुख यांनी ही माहिती दिली.
जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन धारकांवर ‘ई- चलन डिव्हाईस मशीन’द्वारे ‘पेड’ आणि ‘अनपेड’ अशा स्वरुपात दंडात्मक कारवाई करण्यात येते. गेल्या काही दिवसांत पोलिसांनी केलेल्या कारवाईनुसार जिल्ह्यातील १ लाख २१ हजार ९२ वाहनधारकांवर २ लाख ४४ हजार ३७१ चलनाद्वारे कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ९ कोटी ३५ लाख ९१ हजार २५० रुपये इतका दंड प्रलंबित आहे. प्रलंबित असलेल्या दंडाबाबत वाहनाचे चालक व मालक यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून १३ ऑगस्ट २०२२ रोजी होणाऱ्या लोकअदालतीमध्ये दंड भरण्याबाबतच्या नोटिसा मोबाईल संदेशाद्वारे पाठविण्यात आल्या आहेत.
यापूर्वी अनेक वाहनधारकांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून ऑनलाइन नोटिसा पाठवू देखील वाहनधारकांनी प्रलंबित दंड भरत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वाहनधारकांना आवाहन करून एमव्ही अॅक्टनुसार प्रलंबित दंड भरण्याबाबत सांगितले आहे. जवळच्या वाहतूक शाखेत किंवा पोलिस ठाण्यामध्ये जाऊन दंड भरण्यासाठी ता. १२ पर्यंत मुदत दिली आहे.
जे वाहनचालक किंवा मालक वाहनावरील दंडाबाबत मोबाईलवर प्राप्त झालेला संदेश, तसेच न्यायालयाकडून लोकअदालतीच्या नोटिसींनुसार प्रलंबित दंड भरणार नाहीत, त्यांच्याविरुध्द न्यायालयात खटला दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली जाणार आहे. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयातूनच निकाली करून घ्यावे लागणार आहे. १३ ऑगस्ट रोजी प्रलंबित असलेल्या एमव्ही अॅक्ट, ई चलनाचा व खटल्यांचा निकाल लोक अदालतीमध्ये जिल्हा न्यायालयात लागणार आहे.
प्रलंबित असलेला दंड जे वाहनधारक भरणार नाहीत, त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्याची कार्यवाही चालू आहे. तरी वाहनधारकांनी तत्काळ दंड भरावा.
- प्रज्ञा देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.