Mount Kilimanjaro: सांगलीच्या गिर्यारोहकाने आफ्रिकेच्या शिखरावर दिली शिवरायांना अनोखी मानवंदना, केला जागतिक विक्रम

आफ्रिका खंडातील माऊंट किलीमांजारो हे १९ हजार ३४१ फुटांचे सर्वोच्च शिखर सांगलीवाडी येथील गिर्यारोहक तुषार सुभेदार याने यंदाच्या शिवजयंतीला सर केले.
Tushar Subhedar
Tushar SubhedarSakal
Updated on
Summary

आफ्रिका खंडातील माऊंट किलीमांजारो हे १९ हजार ३४१ फुटांचे सर्वोच्च शिखर सांगलीवाडी येथील गिर्यारोहक तुषार सुभेदार याने यंदाच्या शिवजयंतीला सर केले.

सांगली - आफ्रिका खंडातील माऊंट किलीमांजारो हे १९ हजार ३४१ फुटांचे सर्वोच्च शिखर सांगलीवाडी येथील गिर्यारोहक तुषार सुभेदार याने यंदाच्या शिवजयंतीला सर केले. छत्रपती शिवरायांची मूर्ती शिखरावर नेऊन २५ फूट लांब भगवा ध्वज फडकावत त्याने मराठी अस्मिता जागवली. तसेच स्वराज स्थापनेची शपथ घेतलेल्या रायरेश्वर किल्ल्यावरील सात रंगाची माती किलीमांजारो शिखरावर आपल्यासमवेत नेऊन त्यांनी महाराजांना अनोखी मानवंदना दिली. या कामगिरीची नोंद नुकतीच ‘हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये झाली.

असंख्य अडथळे आणि अडचणी पार करत टांझानिया देशातील समुद्रसपाटीपासून १९ हजार फूट उंची असलेल्या शिखरावर मराठी झेंडा फडकावण्याचे ध्येय तुषार यांनी पूर्ण केले. यापूर्वी त्यांनी राज्य; तसेच परराज्यातील २०० किल्ले सर केले आहेत. ‘३६० एक्सप्लोरर’ संस्थेमार्फत आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दीड महिना रोज सराव केला होता. धावणे, चालण्याच्या व्यायामासह त्यांनी योगाचे धडेही गिरवले. १९ फेब्रुवारीला पोहोचण्याच्या उद्देशाने त्यांनी मोहिमेला प्रारंभ केला. सोबत १५ किलो साहित्याचे ओझे सांभाळत रोज सरासरी १५ किलोमीटर अंतर पार करण्याचे उद्दिष्ट ठेवले. रात्री ११ ते सकाळी ७ या वेळेत खारफुटी जमीन, वाळवंट, बर्फाळ प्रदेश अशी निसर्गाची सर्व रुपे अनुभवत ‘किलीमांजारो’वर चढाई केली.

घनदाट जंगल, अवघड मार्ग, सतत बदलते वातावरण, उणे १५ ते २० अंश तापमानाला सामोरे जात तुषारने केलेल्या कामगिरीची जागतिक विक्रम म्हणून नोंद झाली. यासाठी त्यांना सुमारे ४ लाख रुपये खर्च आला. या मोहिमेच्या माध्यमातून त्यांनी सात महाद्वीपामधील पहिले शिखर सर केले. पुढे उर्वरित महाद्वीपामधील सर्वांत उंच सहा शिखरे सर करण्याचा त्याचा मानस आहे.

शालेय; तसेच अभियांत्रिकी शिक्षण येथेच झाले. तेव्हापासून छत्रपती शिवराय हे कायम आकर्षण राहिले आहेत. गेली ८ वर्षे ट्रेकिंग आणि साहसी क्षेत्रातील अनुभवावर परदेशातील मोहिमेसाठी निवड झाली. स्वतःच्या क्षमतेला आजमावून आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध करणे आव्हान होते.मात्र छत्रपतींचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून शिखर सर केलेच. मोहिमेंतर्गत झालेले दोन जागतिक विक्रम मी छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित करतो.

- तुषार सुभेदार, गिर्यारोहक, सांगलीवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.