सांगली :महापालिकेतर्फे डिजिटल शाळांचा डिडिंम वाजविला जात असताना आम आदमी पक्षातर्फे शहरातील विविध शाळांचा पंचनामा करण्यात आला आहे. दोन-तीन शाळांचा ‘शो’ करण्याऐवजी बंद पडत चाललेल्या शाळांच्या पायाभूत सुविधांकडे तातडीने लक्ष द्या, अन्यथा आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला आहे.
पक्षाचे महापालिका समन्वयक प्रा. कृष्णा आलदर, संतोष कदम, रामभाऊ कोकरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका शाळांचा पाहणी करण्यात आली. त्यातून शाळेची दुरवस्था समोर आलीच. त्यावेळी शिक्षकांची पट टिकवण्यासाठीची धडपडही समोर आली. या शाळांना खऱ्या अर्थाने अच्छे दिन येण्यासाठी शो बाजी नव्हे तर प्रत्यक्ष कृतीची गरज असल्याचे मत प्रा. आलदर यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, ‘‘आम्ही पालिका क्षेत्रातील अनेक शाळांना भेटी दिल्या. तेथील स्थिती खूप विदारक आहे. शौचालये नाहीत. असलीतच अतिशय वाईट स्थितीत आहेत. छत गळतेय, त्यांची देखभाल नाही. परिसराची स्वच्छता नाही. शुध्द पाणी नाही. भेट दिलेले शुद्धीकरण संयत्रे बंद आहेत. या शाळांच्या दुरुस्तीसाठी खूप पैशाची गरज नाही. अनेक शिक्षक पट टिकवण्यासाठी धडपडत आहेत. त्यासाठी पदरमोड करून रिक्षाने ते विद्यार्थी आणत आहेत.काही शिक्षक कायम नसतानाही शिकवत आहेत. अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. पालक गरीब आहेत. त्यामुळे महापालिकेनेच त्यांचे पालकत्व स्वीकारून या शाळा टिकवल्या पाहिजेत.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.