सागंली - स्वराज्याची रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे ३२ मण वजनाचे सुवर्णसिंहासन पुन्हा साकारण्याचा संकल्प शिवप्रतिष्ठानने केला आहे. तो लवकर पूर्ण व्हावा, या मागणीसाठी बेळगाव येथील दोन धारकऱ्यांनी सायकलने केदारनाथला जाऊन साकडे घातले. अजित कुलकर्णी १८ दिवसांत सुमारे २ हजार ३०० किलोमीटर प्रवास करून ऋतिक रमेश पाटील (रा. बाळेकुंद्री खुर्द) व पवन बाबूराव पाटील (रा. मुतगा) या दोन तरुणांनी ही सायकलवारी केली.
नुकतेच त्यांनी केदारनाथला दर्शन घेत हिंदवी स्वराज्य सिंहासन पुनर्स्थापना व्हावे, असे मागणे मागितले. बेळगाव येथून २० ऑगस्ट रोजी त्यांचा सायकलप्रवास सुरू झाला. घरच्यांना कोणतीही कल्पना न देता सायंकाळी ते शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचे आशीर्वाद घेतले. श्री. भिडे यांनी या सायकलवारीचे कौतुक करुन सदिच्छा दिल्यानंतर त्यांचा प्रवास नेटाने सुरु झाला.
कर्नाटकातून सुरु झालेला हा प्रवास महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान व उत्तराखंडपर्यंत जाऊन पोहोचला. मंदिरात मुक्काम, मिळेल ते खाणे, दिसेल ते पाणी पिणे, डोंगर-दऱ्या, खाच-खळग्यातून खडतर प्रवास केला. सोसाट्याचा वारा, प्रचंड पाऊस, कडक ऊन अशा प्रतिकूल हवामानाचा सामना करत १८ व्या दिवशी ते केदारनाथला पोहोचले.
गिअर नसणाऱ्या साध्या सायकलीने पहाटे ३ वाजता त्यांचा प्रवास सुरु होई. सरासरी १४० किलोमीटर अंतर ते पार केल्याशिवाय थांबत नसत. एके दिवशी १७० किलोमीटर अंतर त्यांनी सायकलिंग केले. प्रवासात अनंत अडचणी आल्या. सायकल पंक्चर झाली तरी अन्य वाहनांचा वापर न करता पायी जाऊन त्याची दुरुस्ती करुन ते मार्गस्थ झाले. घृष्णेश्वर, हरिव्दार, ऋषिकेश ते केदारनाथ असा त्यांचा सायकल प्रवास प्रेरणादायी व आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे.
भारत देश विश्वगुरू व्हावा, सामर्थ्यशाली बनण्यासाठी छत्रपती शिवरायांचे विचारच योग्य आहेत. जगासमोर ते आदर्श आहेत, मात्र त्यांच्या पश्चात त्यांचे सुवर्णसिंहासन तोडून-मोडून सत्ता खालसा करून ते उद्ध्वस्त करण्यात आले. ३२ मण सोन्याचे सिंहासन पुन्हा त्याच जागेवर उभारणीचा संकल्प लवकर पूर्ण व्हावा, यासाठी हा प्रवास केला. वाटेत अनेकांनी सहकार्य केल्याने अपवाद वगळता प्रवास समाधान देणारा ठरला’’.
-ऋतिक पाटील,धारकरी, श्री शिवप्रतिष्ठान, बेळगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.