अॅग्रोवन कृषी प्रदर्शनास सांगलीत उत्साहात प्रारंभ

अॅग्रोवन कृषी प्रदर्शनास सांगलीत उत्साहात प्रारंभ
Updated on

सांगली -  नेचर केअर फर्टीलायझर्स प्रस्तुत अॅग्रोवन' कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी (ता. 5) सोलापूर जिल्ह्यातील आजनाळे (ता. सांगोला) येथील प्रगतीशील शेतकरी राजाराम यलपल्ले-पाटील यांच्या हस्ते  झाले. रविवार ( ता. 7 ) पर्यत हा कृषीमेळा चालणार आहे. मे. बी. जी. चितळे आणि चितळे जिनस एबीएस इंडिया या प्रदर्शनाचे सहप्रायोजक आहेत.

विट्याच्या नेचर केअर फर्टीलायर्झचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमृत कुलकर्णी, मे. बी. जी. चितळे आणि चितळे जिनस एबीएस इंडियाचे व्यवस्थापक डॉ. सी. एस. जाधव, प्रगतीशील शेतकरी गुणवत गरड, सकाळ (कोल्हापूर) चे उपसरव्यवस्थापक रविंद्र रायकर, सहयोगी संपादक शेखर जोशी, वरिष्ठ व्यवस्थापक(जाहिरात) उदय देशपांडे, अॅग्रोवन (कोल्हापूर) चे व्यवस्थापक शितल मासाळ आदींच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा झाला. येथील नेमिनाथनगर
येथील मैदानावर सकाळी दहा ते सायंकाळ सात या वेळेत प्रदर्शन सुरु रहाणार आहे.

शेती क्षेत्रात उल्लेनीय काम करणाऱ्या शेतीपूरक व्यवसाय, निविष्ठा, यंत्राच्या कंपन्या या प्रदर्शनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या भेटीला आल्या आहेत. याबरोबर काही शेती क्षेत्रात काम करणाऱ्या काही संस्थांचे स्टॉल्सही प्रदर्शनात सज्ज झाले आहे. हे पाहण्यासाठी पहिल्यादिवशी शेतकऱ्यांनी गर्दी केली.

विशेष करुन सेंद्रीय शेतीबाबत शेतकऱ्यांची खास उत्सुकता दिसून आली. शेतकऱ्यांनी सेंद्रीय खते निविष्ठां याबाबतीत खास स्वारस्य दाखविले. सध्यस्थितीत पशुधन सांभाळणे, त्याचे व्यवस्थापन करणे अडचणीचे होत आहे. पशुधन व्यवस्थापनात आधुनिकता आणण्यासाठीच्या उपायाबाबत शेतकऱ्यांनी सहभागी कंपन्या, संस्थांशी संपर्क साधला. उत्कृष्ट जातीच्या जनावरांची वीर्य बॅंक, जैविक कीटकनाशके, विद्राव्य खते, ग्रीन हाऊस टेक्‍नॉलॉजी आणि इप्लिमेंटसच्या स्टॉलकडेही शेतकऱ्यांचा ओढा दिसून आला. 

व्याखानांना गर्दी

प्रदर्शनाच्या दालनातच विविध पिकांवरील व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी गुणवंत गरड, ( पंढरपूरचे शेतकरी राजाराम यलपल्ले-पाटील व डाळिंब तज्ज्ञ गुणवंत गरड यांचे फळ लागवड व निर्यातक्षम
डाळिंब उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर व्याख्यान झाले. दुपारच्या सत्रात कालवडेच्या कल्याणी गोरक्षण ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ निलेश मालेकर यांचे पिक वाढीचे तंत्र आणि मंत्र या विषयावर व्याख्यान झाले.

प्रदर्शनात हे अवश्‍य पहा

प्रदर्शनाचे आकर्षण

  • सेंद्रीय शेतीविषयी सर्व काही

  • जगभरातील दुग्ध उत्पादनात आघाडीवर असणाऱ्या जनावरांच्या जातीची वीर्य बॅंक

  • शेततळी, शेडनेट, मल्चिंग ची विविध दालने

  • सर्वाधिक उत्पादनवाढीसाठी पोषण मूल्य करणारी खते, औषधे

  • पाणी व्यवस्थापन बचत आणि त्यातून सुधारणा करणाऱ्या बाबी

  • हुमणी च्या समूळ उच्चाटनाचे तंत्र

  • पेरणी यंत्र, कडबा कुट्टी जनावरांचे मॅट,

  • ट्रॅक्‍टर अवजारे, कृषी विषयक विविध पुस्तके

शनिवारी होणारी व्याख्याने
वेळ -  दुपारी 12 ते 2
वक्ते- सुरेश माने-पाटील (माजी शास्त्रज्ञ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट,
मांजरी पुणे
विषय- भरघोस उत्पन्न वाढीसाठी ऊस पिकाचे व्यवस्थापन

वेळ- दूपारी 3 ते 5
वक्ते- मनोज वेताळ (उपविभागीय कृषी अधिकारी मिरज)
विषय- शेतीच्या शासकीय योजना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.