Sangli : डॉ. आंबेडकर कमान वाद : बेडगमध्ये जाऊन चौकशी समितीची पाहणी, वादावर लवकरच निघणार तोडगा?

जागेच्या कागदपत्रांची तपासणीनंतर अंतिम अहवाल तयार केला जाण्याची शक्यता
Dr. Babasaheb Ambedkar Arch Case
Dr. Babasaheb Ambedkar Arch Caseesakal
Updated on
Summary

समितीने जिल्हा परिषदेच्या सभागृहात समितीने दोन्ही बाजूंचे म्हणणे ‘इन कॅमेरा’ ऐकून घेतले होते. त्यानंतर आज समितीने थेट बेडगमध्ये जाऊन पाहणी केली.

सांगली : बेडग (ता. मिरज) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कमानप्रकरणी (Dr. Babasaheb Ambedkar Arch Case) चौकशी समितीने काल (बुधवार) बेडगमध्ये जाऊन जागेची पाहणी केली. जागेच्या कागदपत्रांची तपासणीही करण्यात येणार आहे. समितीने गावकऱ्यांचे म्हणणे ऐकले आहे.

चौकशी समिती अहवाल कधी सादर करणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. बेडग (Bedag) येथील स्वागत कमान पाडल्या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे (Trupti Dhodmise) यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली आहे.

Dr. Babasaheb Ambedkar Arch Case
Sangli News : डाॅ. आंबेडकरांच्या नावाची कमान पाडणाऱ्या दोषींवर त्वरित कारवाई करा; बेडग ग्रामस्थांसह दलित समाज आक्रमक

समितीने जिल्हा परिषदेच्या सभागृहात समितीने दोन्ही बाजूंचे म्हणणे ‘इन कॅमेरा’ ऐकून घेतले होते. त्यानंतर आज समितीने थेट बेडगमध्ये जाऊन पाहणी केली. गावात जाऊन कमान उभारण्यात येणाऱ्या जागेस भेट देऊन पाहणी केली. ती जागा कुणाच्या क्षेत्रात येते, याची माहिती मागविण्यात आली आहे. त्यासाठी कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. कमानीच्या बाजूला देवीचे मंदिर आहे. तेथे कमान उभारली आहे.

Dr. Babasaheb Ambedkar Arch Case
Sangli : बेडगमध्ये JCB नं पाडली आंबेडकरांच्या नावाची कमान; दोन ग्रामसेवकांचं निलंबन, 'सीईओं'ची मोठी कारवाई

त्याची पाहणीही समितीने केली. जागेच्या कागदपत्रांची तपासणीनंतर अंतिम अहवाल तयार केला जाण्याची शक्यता आहे. यावेळी समितीचे सदस्य तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता भारती बिराजे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी बाळासाहेब कामत, मिरजेचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, पोलिस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा, गटविकास अधिकारी संध्या जगताप उपस्थित होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()