Sangli News : इटकरे परिसरात बिबट्याकडून हल्लासत्र सुरूच; घोड्याच्या शिंगरूवर हल्ला

कुटुंबियांनी आरडाओरडा केल्यावर बिबट्या सुमारे पाचशे फुटांवर शिंगरू टाकून पळून गेला.
sangli
sangli sakal
Updated on

इटकरे - येथील शिवारात बिबट्यांचे हल्ला सत्र सुरूच आहे. गुरुवारी रात्री मेंढपाळ कळपातील घोड्याच्या शिंगरू वर बिबट्याने हल्ला केला. त्यात ते मृत झाले. ही घटना तुकाई मंदिर परिसरात घडली.येथील सुभाष पाटील यांच्या शेतात मेंढपाळ वास्तव्यास आहेत. आनंदा मारुती बंडगर (रा. सरूड) यांच्या येथील ताफ्यात मेंढरे, घोडी, कुत्री, सहा- सात लोक आहेत.

बंडगर यांच्या घोडीला पंधरा दिवसापूर्वी नर जातीचे शिंगरू झाले. गुरुवारी रात्री सव्वा अकरा वाजता कुत्र्यांनी गोंगाट केला. बंडगर यांनी थोडे पुढे जाऊन पाहिले. बिबट्या या शिंगरूला गळा धरून नेताना दिसला.

कुटुंबियांनी आरडाओरडा केल्यावर बिबट्या सुमारे पाचशे फुटांवर शिंगरू टाकून पळून गेला. गळ्यावर खोलवर चावा घेतल्याने ते मृत झाले. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे. वनविभाग अधिकार्‍यांनी पंचनामा केला. वनपाल संजय पाटील, वनरक्षक विशाल डूबल, क्षेत्र सहाय्यक शहाजी पाटील, पांडुरंग उगळे यांनी बिबट्याचे ठसे, माग पाहिला. हा बिबट्या अडीच महिन्याचा असावा असा अंदाज त्यांनी दिला. नागरिकांना सजगतेच्या सुचना दिल्या.

sangli
Sangli Police : सांगलीत कॉलर धरून, जातिवाचक शिव्या देत पोलिसाला मारहाण; विश्रामबाग पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल

दरम्यान, वर्षभरात पाळीव जनावरांवर हल्ले सुरूच आहेत. या आठवड्यात निकम मळा, गजरे मळा परिसरात बिबट्याने कुत्री, वानर फस्त केलेत. त्याचे अवशेष शेतकरी रोजच पाहतात. मोठ्या उसात व विहिरीवर जाणे शेतकर्‍यांना भीतीचे ठरले आहे. गाव परिसर व तुकाई डोंगर, कामेरी बाजूस सहा सात बिबटे दिसतात असे शेतकरी सांगतात.

sangli
Solapur : आरक्षणासाठी आत्महत्या करू नका; पोरचं मेली तर आरक्षण घेवून करायचं काय - मनोज जरांगे पाटील

"इटकरे परिसरात वर्षभरात बिबट्याचे अनेक ठिकाणी हल्ले झालेत. संख्याही वाढत आहे. रात्रीचे प्रवासी, शेतकरी, शेत वस्ती, उघड्यावर राहणारी कुटुंबांना धोका आहे. वनविभागाने ठोस आराखडा आखावा."

नंदकुमार सुभाष पाटील

इटकरे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.