OBC Melava : 'विश्वजित कदम, विशाल पाटील कधीच ओबीसी मेळाव्याविरोधात नव्हते'; सांगलीत काँग्रेसचे स्पष्टीकरण

Sangli OBC Melava : आमच्या दिग्गज नेत्यांनी आम्हाला कधीच जातीयवाद शिकवला नाही. पक्षाने मराठा-ओबीसी वाद कधीच केला गेला नाही.
Vishal Pati Vishwajeet Kadam
Vishal Pati Vishwajeet KadamEsakal
Updated on
Summary

जातनिहाय जनगणना करण्याची मागणी खासदार राहुल गांधी करीत आहेत. समाजातील सर्व घटकांना आरक्षणाची भूमिका घेतली आहे.

सांगली : ‘वसंतदादा पाटील, पतंगराव कदम, मदनभाऊ पाटील यांच्यापासून ते विश्‍वजित कदम, विशाल पाटील यांच्यापर्यंत काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याने ओबीसींचा सन्मान केला आहे. मराठा-ओबीसींमध्ये दुहीचा तसेच मेळाव्यात विश्‍वजित, विशाल (Vishal Patil) यांच्याबाबत गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला. या नेत्यांनी कधीच ओबीसी (OBC) मेळाव्याबाबत चुकीचे वक्तव्य केलेले नाही,’ असे स्पष्टीकरण काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय मेंढे, संतोष पाटील, प्रमोद सूर्यवंशी, विशाल कलगुटगी यांनी पत्रकार परिषदेत दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.