सांगली - पाटील कुटुंबातील ती मोठी मुलगी. ती यंदा नववीला होता. मागच्या शुक्रवारी तिला अचानक चक्कर आली अन् ती कोसळली. तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. घरातल्यांनी अगदी तळहतावरच्या फोडाप्रमाणे तिला सांभाळले होते. मात्र, उपचार सुरू असताना काळाने तिच्यावर घाला घातला. तिनं साथ दिली नाही. तिच्या मेंदूचे कार्य थांबले (ब्रेन डेड) आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.