Sangli Politics : माजी महापौरांसह तीन माजी नगरसेवक अजितदादांच्या गटात; कोल्हापुरात ठरला प्लॅन

राष्ट्रवादीत बंड करून स्वतंत्र झाल्यानंतर अजित पवार यांनी जिल्ह्यात पक्षबांधणीची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे.
Ajit Pawar
Ajit Pawaresakal
Updated on
Summary

काँग्रेस (Congress) नेत्या श्रीमती जयश्री पाटील याही अजित पवार यांना भेटल्या, मात्र त्यामागे खासगी कारण असल्याचे सांगण्यात आले.

सांगली : धनगर समाजाचे (Dhangar Community) नेते, माजी मंत्री शिवाजीराव शेंडगे यांचे पुतणे जयसिंगराव शेंडगे यांच्यासह माजी महापौर सुरेश पाटील दोन दिवसांत मुंबईत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कोल्हापूर दौऱ्यात आज हा प्लॅन निश्‍चित झाला. माजी नगरसेवक हणमंतराव पवार, विष्णू माने यांनीही त्यांची भेट घेतली.

काँग्रेस (Congress) नेत्या श्रीमती जयश्री पाटील याही अजित पवार यांना भेटल्या, मात्र त्यामागे खासगी कारण असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, अजित पवार यांच्या ५ फेब्रुवारीच्या कुपवाड दौऱ्याची शक्यता ‘फिफ्टी-फिक्टी’ आहे. त्या दिवशी ते अयोध्येला श्रीराम मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत.

Ajit Pawar
कोल्हापूर शहराची लवकरच हद्दवाढ? अजितदादांनी हद्दवाढीचा चेंडू पुन्हा ढकलला स्थानिक नेत्यांच्या कोर्टात!

हा दौरा लवकर आवरून मी येण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही तयारीला लागा, अशा सूचना त्यांनी दिल्याचे अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे यांनी सांगितले. माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी नगरसेवक गजानन मगदूम उपस्थित होते. राष्ट्रवादीत बंड करून स्वतंत्र झाल्यानंतर अजित पवार यांनी जिल्ह्यात पक्षबांधणीची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. येथे प्रमुख नेत्यांना खेचण्याचा त्यांचा ताकदीने प्रयत्न सरू आहे. त्याचा पहिला मोठा स्फोट ५ फेब्रुवारीला कुपवाडला करण्याचा त्यांचा मानस आहे.

Ajit Pawar
'ठराव करताना आम्हाला विश्‍वासातच घेतलं नाही'; डाॅ. आंबेडकर कमान पाडल्याप्रकरणी सात सदस्यांचा मोठा दावा

अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी त्यांची भेट घेतली. त्यांच्या कुपवाड दौऱ्याची तयारी आणि त्यावेळी प्रवेश या विषयांवर प्राधान्याने चर्चा झाली. माजी महापौर सुरेश पाटील यांच्या प्रवेशाची निश्‍चिती आधीच झाली आहे. फक्त स्थळ ठरणे बाकी होते. त्यांनी मुंबईत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला असून त्याचवेळी जयसिंगराव शेंडगे हेही प्रवेश करणार आहेत, असे सांगण्यात आले. माजी नगरसेवक हणमंतराव पवार, विष्णू माने, स्वाती पारधी आदींच्या प्रवेशाचा सोहळा अजित पवार यांच्या कुपवाड दौऱ्यात होईल, असे नियोजन करण्यात आले आहे.

जयश्रीताईंची भेट, वसंतदादा बँकेसाठी

काँग्रेस नेत्या श्रीमती जयश्री पाटील यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांची भेट घेतली. त्यांनी वसंतदादा बँकेसंदर्भात सुरू असलेल्या कारवाईबाबत त्यांच्याशी चर्चा केल्याचे सांगण्यात आले. या भेटीत राजकीय चर्चा झालेली नाही, असे स्पष्ट करण्यात आले.

Ajit Pawar
Gokul Dudh Sangh : 'गोकुळच्या प्रगतीला कोणाचीही दृष्ट लागू देऊ नका'; असं का म्हणाले अजितदादा?

बागवान ‘होल्ड’वर

माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांचा प्रवेश लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. मिरज येथील कोणालाही मला विश्‍वासात घेतल्याशिवाय घेऊ नका, अशी भूमिका माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी घेतली आहे. नायकवडी सुरुवातीच्या टप्प्यात अजित पवार गटात दाखल झालेले नेते आहेत. बागवान यांच्याशी त्यांचे फार सख्य नाही. त्यामुळे तूर्त तरी बागवान यांचा प्रवेश लांबणीवर टाकला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.