सांगली : मंदिर उघडणार, नारळ फुटणार!

बाजारात हालचाल गतिमान; सध्याची उलाढाल २५ टक्क्यांवर
सांगली : मंदिर उघडणार, नारळ फुटणार!
sakal
Updated on

सांगली : राज्यातील धार्मिक स्थळे ७ ऑक्टोबरपासून म्हणजे घटस्थापनेला उघडण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. त्याचा परिणाम मंदिरांवर आधारित घटकांवर दिसू लागला आहे. नारळ बाजारातील हालचाली गतिमान झाल्या आहेत. एका जिल्ह्यात दररोज घाऊक बाजारात ५० हजार नारळाची विक्री होते. ती सध्या अवघ्या १० ते १२ हजारांवर आली आहे. दसरा, दिवाळीच्या निमित्ताने नारळ बाजाराला बुस्ट मिळेल, असा विश्‍वास बाजारपेठेत व्यक्त होत आहे.

येथील बाजारातील नारळाची महिन्याची घाऊक उलाढाल सुमारे सव्वादोन कोटी रुपयांची आहे. कोरोना, महापूर संकटाने त्याला मोठा फटका बसला आहे. मंदिरे उघडण्याच्या निर्णयामुळे आता या बाजारात थोडा उत्साह संचारला आहे. सामान्य काळात येथे दररोज किमान दोन ट्रक नारळाची घाऊक बाजारात विक्री होते.

गणपती पेठ आणि वसंतदादा मार्केट यार्ड हे मुख्य केंद्र आहे. सध्या उलाढाल अर्धा ट्रक नारळ म्हणजे १२ हजारांवर आली आहे. नारळ विक्रेते संकटात आहेत. त्यांची उधारी थकली आहेत. रोजच्या जगण्याचा संघर्ष सुरू झाला आहे. आता मंदिरे सुरू होतील आणि पुन्हा एकदा उलाढाल सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यापारी व्यक्त करत आहेत. घाऊक बाजारात नारळाचे दर १२ रुपये ते २० रुपये आहे.

गेली साठ वर्षे नारळ व्यापारात असलेल्या पेढीचे मालक विलास खेडकर म्हणाले, ‘‘संकष्टीला गणपती मंदिरासमोर ५ हजार नारळ खपायचे. गेल्या संकष्टीला फक्त दीड हजार खपले. गणेशोत्सवात दररोज पाच हजार नारळ विकले जायचे, मानाच्या गणपतीच्या विसर्जनादिवशी २५ हजार नारळ विकले जायचे. यंदा अगदीच किरकोळ उलाढाल झाली. मंदिरे उघडली तरच नारळांना मागणी वाढते.’’

स्थानिक नारळ भारी

"सांगली व परिसरात पिकणारे नारळ हे तामिळनाडू, कर्नाटकपेक्षा उत्तम आहेत. परंतु, ते कधी काढायचे याचे ज्ञान लोकांना नाही, त्यामुळे बाजारात त्याचे मूल्य कमी होते. येथील नारळ उत्पादकांना, परसबागेत नारळ पिकवणाऱ्यांना त्याची माहिती देण्याची गरज व्यापाऱ्यांनी व्यक्त केली."

कुठला नारळ चालतो

  • तामिळनाडूचा शेंडीचा नारळ सर्वोत्तम, तो अधिक काळ टिकतो

  • केरळचा नारळ तेल काढण्यासाठी चालतो

  • कर्नाटकचा नारळ हॉटेल उपयोगासाठी सर्वोत्तम

  • स्थानिक नारळात पाणी उत्तम व खोबऱ्याची गुणवत्ताही चांगली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()