300 फूट उंचीवरून कोसळणारा 'हा' धबधबा पर्यटकांना लागला खुणावू; चांदोलीतील धबधब्यांची पर्यटकांना साद

अत्यंत नयनरम्य असणारे हे धबधबे पर्यटकांपासून मात्र वंचित आहेत. याला कारण म्हणजे इथंपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता नाही.
Sangli Tourism Waterfalls in Chandoli Dam
Sangli Tourism Waterfalls in Chandoli Damesakal
Updated on
Summary

चांदोली परिसरात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे हे धबधबे पूर्ण क्षमतेने कोसळू लागले आहेत. त्यामुळे त्यांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.

वारणावती : चांदोलीच्या (Chandoli Dam) हिरव्यागर्द घनदाट जंगलातून नागमोडी गेलेली पायवाट, पावसाच्या सरी, अंगाला झोंबणारा थंडगार वारा, पक्ष्यांचा किलबिलाट, त्यातच सर्वदूर पसरलेले धुके, हिरवीगर्द झाडी आणि समोरच खळखळ आवाज करत पांढराशुभ्र फेसाळत ३०० फूट उंचीवरून कोसळणारा उखळूचा धबधबा पर्यटकांना जणू खुणावतच आहे, असंच वाटतं.

या धबधब्यासह शित्तुर परिसरातील मुसळीचा कडा, आगरचा कडा, मंडपचा कडा, सोनवडेपैकी खोतवाडीजवळील मरगोबा धबधबा (Margoba Falls), असे चांदोली परिसरातील अनेक धबधबे पर्यटकांना एक पर्वणीच ठरत आहेत. चांदोली धरणापासून अवघ्या चार-पाच किलोमीटरवर असणारे हे धबधबे. घनदाट जंगलामुळे त्यांचे मार्ग सापडत नाहीत.

Sangli Tourism Waterfalls in Chandoli Dam
प्रवासाची आवड असेल आणि इतिहासात रस असेल, तर 'या' 7 पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या!

अत्यंत नयनरम्य असणारे हे धबधबे पर्यटकांपासून मात्र वंचित आहेत. याला कारण म्हणजे इथंपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता नाही. कुणी जायचा प्रयत्न केला तर घनदाट जंगलामुळे मार्ग सापडत नाही. त्यातूनही काही हौशी पर्यटक चार-पाच किलोमीटरचा खडतर प्रवास करत इथपर्यंत पोहोचतात. येथील दृश्य पाहिल्यानंतर खडतर प्रवास करून आलेला थकवा क्षणात नाहीसा झाल्याचे अनुभव अनेक पर्यटक घेतात. मात्र सध्या चांदोली पर्यटनाच्या धर्तीवर येथे गाईड उपलब्ध होऊ लागल्याने बऱ्याच अंशी पर्यटकांची गैरसोय थांबली आहे.

Sangli Tourism Waterfalls in Chandoli Dam
Kolhapur Flood : पंचगंगेची पातळी 41.9 फुटांवर.. कोल्हापूर-रत्नागिरी, बावडा-शिये मार्ग रात्री उशिरा बंद; कोणते मार्ग सुरू?

चांदोली परिसरात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे हे धबधबे पूर्ण क्षमतेने कोसळू लागले आहेत. त्यामुळे त्यांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. हे धबधबे घनदाट जंगलात असल्यामुळे ते पर्यटक, तसेच प्रसिद्धीपासून वंचित आहेत.

मात्र गेल्या पाच-सहा वर्षांत त्यांना प्रसिद्धी मिळाल्यामुळे व गाईडची उपलब्धता होत असल्याने अनेक हौसी पर्यटकांना तिथंपर्यंत जाता येते. मात्र, खडतर प्रवासामुळे व मोठ्या प्रमाणावर पडणाऱ्या पावसामुळे अनेक पर्यटक अर्ध्या वाटेतून परततात. त्यामुळे पर्यटकांची फारशी गर्दी दिसत नाही. पर्यटन विकास महामंडळाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. संबंधित विभागाने धबधब्यापर्यंत पोहोचण्याचा केवळ मार्ग जरी केला, तरी शेकडो पर्यटक धबधब्यापर्यंत पोहोचतील. सध्या चांदोली परिसरात विविध रिसॉर्ट झाल्याने पर्यटकांची मुक्कामाची व जेवणाची सोय झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.