सांगली : अडथळे आणणाऱ्यांना धडा शिकवा

गाडगीळ; सत्ताधारी अण्णासाहेब गोडबोले प्रगती पॅनल प्रचार प्रारंभ
अर्बन बँक सत्ताधारी पॅनेल प्रचाराची सुरुवात
अर्बन बँक सत्ताधारी पॅनेल प्रचाराची सुरुवातsakal
Updated on

सांगली : सांगली अर्बन बँकेत तुमची सत्ता असताना किती शाखा काढल्या? तुम्ही केलेली घाण काढण्यातच आमची सात वर्षे गेली. बँकेच्या विकासात अडथळे आणणारे यांना या निवडणुकीत धडा शिकवावा, अशी टीका प्रगती पॅनलप्रमुख विद्यमान अध्यक्ष गणेश गाडगीळ यांनी येथे बापूसाहेब पुजारी यांचे नाव न घेता केली.

अर्बन बँक सत्ताधारी पॅनेल प्रचाराची सुरुवात गणपती मंदिर येथे झाली. त्यानंतर टिळक स्मारक भवनात झालेल्या सभेत ते बोलत होते. आमदार सुधीर गाडगीळ, ह. भ. प. गुरुनाथ कोटणीस महाराज, ज्येष्ठ व्यापारी मनोहर सारडा यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचारास सुरुवात झाली. यानंतर गणपती पेठ आणि अन्य भागातून बँक निवडणुकीचे प्रचार फेरी काढण्यात आली. त्यानंतर टिळक स्मारक मंदिर येथे जाहीर सभा झाली.

अर्बन बँकेचा राजकारणासाठी वापर केल्याच्या विरोधकांच्या टीकेवर अध्यक्ष गाडगीळ म्हणाले, की आम्ही शाखा काढल्या नाहीत.लाभांश दिला नाही, पण तुमची सत्ता असताना काय केले ? तुम्ही फक्त तीन शाखा काढल्या. तुम्ही केलेली घाण काढण्यात आमची सात वर्षे गेली. आमचा कारभार पारदर्शीच आहे. हे सभासदांनाही माहित आहे. विरोधकांना उमेदवार मिळाले नाहीत. त्यांनी बिनविरोध केली असती तर ६०- ७० लाख रुपये वाचले असते. बँकेच्या विकासात अडथळे आणणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा. यापुढे पुन्हा असे वेडेवाकडे पाऊल उचलणार नाही याची खबरदारी घ्या. आपली सत्ता पुन्हा येताच नवीन शाखांसह लाभांशसाठी आर्थिक परिस्थिती निर्माण करु. यंदा सर्व उमेदवार दुप्पट मताधिक्याने विजय होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, आम्ही कधीच बँक आणि राजकारण एकत्र आणले नाही. एखाद्याची बदली करा, एखाद्याला कर्ज द्या अशी शिफारस आम्ही कधीच केली नाही. मात्र बँकेच्या हितासाठी बड्यांच्या कर्ज प्रकरणात वसुलीसाठी आम्ही लक्ष घातले. नगरसेवक शेखर इनामदार म्हणाले, पॅनल उमेदवारांकडे कर्तृत्व आणि प्रतिमांमुळे पॅनलचा विजय निश्चित आहे. बँकेच्या सभासदांना मतपेटी पेटीपर्यंत आणण्याचा प्रयत्न करा.

उमेदवार सतीश मालू, कालिदास हरिदास, अनंत मानवी, शैलेंद्र तेलंग, संजय पाटील, डॉ. रवींद्र आरळी, श्रीकांत देशपांडे, अश्विनी आठवले, स्वाती करंदीकर, सागर घोंगडे, रवींद्र भाकरे तसेच महापालिकेतील भाजपाचे गटनेते विनायक सिंहासने, नगरसेवक संजय कुलकर्णी, युवराज बावडेकर, उर्मिला बेलवलकर, सुब्राव मद्रासी आदी उपस्थित होते. उमेदवार संजय धामणगावकर यांनी प्रास्ताविक केले. हणमंत पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.