सांगली : शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान समिर वानखडे यांच्या पाठीशी

समीर वानखेडे यांच्यावर आरोप करणारे मंत्री नबाव मलिकांच्या विरोधात
सांगली : शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान समिर वानखडे यांच्या पाठीशी
सांगली : शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान समिर वानखडे यांच्या पाठीशीsakal
Updated on

सांगली : ड्रग्ज प्रकरणावरुन एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप करणारे मंत्री नबाव मलिकांच्या विरोधात आणि वानखेडेंच्या समर्थनार्थ आज शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान या संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. मुंबईत दोन ऑक्टोबर रोजी समुद्रात एका कारवाईत क्रूझवरील ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश करण्यात आला. या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले त्याला वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मात्र वानखेडे यांच्यावर वैयक्तिक आरोप करण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांवरही मलिक यांनी आरोप केल्याने सांगलीमध्ये आज समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने मोर्चा काढला. तसेच मंत्री मलिक यांच्या विरोधात निदर्शने केली. यावेळी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक नितीन चौगुले यांनी, नवाब मलिक यांचे ड्रग्ज तस्करांशी संबंध आहेत का? याची चौकशी महाराष्ट्र सरकारने करावी अशी मागणी केली. समीर वानखेडे यांच्‍यासारख्‍या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या इमानदार अधिकाऱ्यांचे खच्चीकरण नवाब मलिकांसारखे जबाबदार मंत्री करत आहेत.

सांगली : शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान समिर वानखडे यांच्या पाठीशी
औरंगाबाद की संभाजीनगर? सरकारच्या जीआरवरून पुन्हा वाद

चौगुले म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या मंत्र्याला ताबडतोब मंत्रीमंडळामधून काढून टाकावे.” अशी मागणीही चौगुले यांनी केली. तसेच सरकारी कामात, तपासात हस्तक्षेप केल्याबद्दल मंत्री नवाब मलिक यांच्यावर कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशीही मागणी चौगुले यांनी केली. ते म्हणाले, मंत्री नवाब मलिक यांच्या खात्याचा हा विषय नाही. तरी ते रोज पत्रकार परिषद घेऊन एनसीबीच्या कारवाईवर तसेच अधिकारी समीर वानखेडेवर आरोप करत आहेत.

फासावर लटकवलं पाहिजे क्रूझवरील रेव्ह पार्टीवर छापा टाकण्याचे काम समीर वानखेडे यांनी केले आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी तरुणाईला बर्बाद करण्याचं काम करणाऱ्या ड्रग्ज माफियांवर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे. त्यांना फासावर लटकवले पाहिजे.” असे चौगुले म्हणाले. चौगुले म्हणाले, समीर वानखेडे यांच्या सारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.