Sangola News : आबासाहेब, तुमच्या पक्षात पण..!" गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर शेकापमधील दुफळीची होतेय सर्वत्र चर्चा

स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे फोटोसह त्यांनी एकाच पक्षात, एकाच झेंड्याखाली आयुष्यभर काम केल्याचे सोशल मीडियावर झळकू लागले
sangola ganpatrao deshmukh Peasants and Workers Party crisis maharashtra politics
sangola ganpatrao deshmukh Peasants and Workers Party crisis maharashtra politicssakal
Updated on

सांगोला : राजकारणामधील पक्षनिष्ठा, तत्वे, मूल्ये, आदर्शवाद सांभाळून तब्बल अकरा वेळा एकाच पक्षात, एका झेंड्याखाली विश्वविक्रमी आमदार राहिलेले स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या शेतकरी कामगार पक्षातही बंडखोरीचे ग्रहण लागण्याची शक्यता आहे. "आबासाहेब, तुमच्या पक्षात पण..!" अशीच अवस्था आज शेकापमध्येही दिसू लागली आहे.

राज्याच्या राजकारणामधील विविध पक्षातील पक्षांतर्गत बंडाळी, गटबाजी, हेवे - दाव्यामुळे अनेक उलतापालथ्या सुरू आहेत. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस मधील बंडाळी, आमदारांच्या गटबाजी यामुळे राजकारणातील पक्षनिष्ठा, तत्वे, विचार, ध्येयधोरणे यावर सर्वत्र चर्चा सुरू झाली.

यामध्ये स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे फोटोसह त्यांनी एकाच पक्षात, एकाच झेंड्याखाली आयुष्यभर काम केल्याचे सोशल मीडियावर झळकू लागले होते. आयुष्यभर राजकारणात तत्वेनिष्ठ सांभाळून समाजकारण केल्याने स्वर्गीय गणपतराव देशमुख यांना सर्वत्र मानसन्मान मिळत होता.

sangola ganpatrao deshmukh Peasants and Workers Party crisis maharashtra politics
Sangola : सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती; सभापतीपदी समाधान पाटील व उपसभापती माणिक वाघमारे यांची निवड

विधानसभेमधील त्यांनी आपल्या भाषणांमध्ये अभ्यास वृत्ती दाखवून दिली होती. परंतु त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपली पक्षनिष्ठा सोडली नव्हती. प्रसंगी मंत्रीपद नाकारले, परंतु शेतकरी कामगार पक्षातून बाहेर मात्र पडले नाहीत.

आज त्यांच्याच मतदारसंघात, त्यांच्याच पक्षात नेतृत्वावरून धुसफूस सुरू असल्याचे दिसू लागले आहे. यामध्ये नुकत्याच काही नेतेमंडळींनी व कार्यकर्त्यांनी आम्ही वेगळा विचार करू शकतो अशीही भाषा वापरली गेल्याने "आबासाहेब तुमच्या पक्षात पण..!" अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.

sangola ganpatrao deshmukh Peasants and Workers Party crisis maharashtra politics
Sangola Crime : डोक्यात दगड घालून सेंट्रींग कामगाराचा खून; अल्पवयीन मुलासह तिघांना घेतले ताब्यात

पक्ष नेतृत्वावरूनच होतेय धूसपुस -

मागील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय आबासाहेब (गणपतराव देशमुख) यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांचा अल्पशा मताने पराभव झाला होता. या निवडणुकीनंतर डॉ. अनिकेत देशमुख हे पुढील शिक्षणामुळे त्यांचा मतदारसंघाकडे संपर्क तुटला होता.

यातच स्वर्गीय आबासाहेबांचे दुसरे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मात्र आबासाहेबांच्या निधनानंतर सांगोल्यात स्थायिक होऊन पक्ष वाढीसाठी, पक्ष संघटनेसाठी कार्य सुरू केले. सध्या ते पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.

परंतु सध्या त्यांनी पक्षांमध्ये मोठी कमांड निर्माण केल्यामुळे त्यांच्याच नेतृत्वामुळे सध्या पक्षांमधील काही नेतेमंडळीचे, कार्यकर्त्यांचे धुसफुस सुरू आहे.

sangola ganpatrao deshmukh Peasants and Workers Party crisis maharashtra politics
Solapur News : पर्यावरण संतुलनासाठी पुरवठा विभाग लावणार 24,106 झाडे

डॉ. बाबासाहेब देशमुख हे शेकाप पक्षामध्ये निर्णय प्रक्रियेत सर्वांना सामावून घेत नसल्याचे काही नेतेमंडळी व कार्यकर्ते उघडपणे बोलत आहेत. स्वर्गीय आबासाहेबांप्रमाणे सर्वसमावेशक असा निर्णय होत नसल्याचे कार्यकर्ते म्हणत आहेत.

युती, आघाड्यावरून नाराजी नाट्य

गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर पक्षामध्ये एकमुखी निर्णय क्षमतेचा अभाव निर्माण झाला आहे. त्यांच्या पश्चात झालेल्या काही सहकारी संस्थांच्या निवडणुकीमथ्ये विरोधकांशी केलेली हात मिळवणी व माणगंगा सहकार साखर कारखाना निवडणुकीमध्ये घेतलेली माघारी ही काही नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली आहे.

काही जणांना सूतगिरणी, सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती व इतर संस्थेमध्ये पदाची संधी न मिळाल्यामुळे ते पक्ष नेतृत्वाला विरोध करीत असल्याचे कार्यकर्तेच एकमेकांचे उणे-धुणे काढताना दिसत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.