Gram Panchayat Result : निवडणुकीत राष्ट्रवादीचा 'किल्ला' भक्कम; खासदार गटानंही दाखवली ताकद, गावागावांत प्रस्थापितांना हादरे

खासदार संजय पाटील (Sanjay Patil) गटानेही ताकद दाखवली.
Gram Panchayat Election Kavathe Mahankal
Gram Panchayat Election Kavathe Mahankalesakal
Updated on
Summary

सध्याच्या आघाड्यांच्या राजकारणामुळे गावपातळीवर स्थानिक नेत्यांसह कार्यकर्ते संभ्रमात पडलेले दिसत आहे.

कवठेमहांकाळ : गावपातळीवर सत्तेचे सिंहासन असलेल्या कवठेमहांकाळ (Kavathe Mahankal) तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका (Gram Panchayat Election) झाल्या. काही ठिकाणी सोयीनुसार गावपातळीवर आघाड्या झाल्या. तालुक्याच्या राजकारणात आघाड्यांचे पेव दिसून आले.

Gram Panchayat Election Kavathe Mahankal
कर्नाटकच्या राजकारणातील मोठी बातमी! शिवकुमार-जारकीहोळींची गुप्त बैठक; चर्चेनंतर DK थेट दिल्लीला रवाना, काय घडणार?

ग्रामपंचायत निवडणुकीत माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाने बाजी मारली असली, तरी राष्ट्रवादीनेही किल्ला भक्कम ठेवण्याचा प्रयत्न केला. खासदार संजय पाटील (Sanjay Patil) गटानेही ताकद दाखवली. कवठेमहांकाळ तालुका हा नेहमीच राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. तालुक्यात प्रत्येक निवडणुकीत आघाडीचा फॉर्म्युला नेहमीच सर्वांना दिसून आला.

गावपातळीपासून ते जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांपर्यंत सर्व ठिकाणी आघाड्या झाल्याचे अनेकवेळा दिसले. तालुक्यातील २० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनिमित्त गावोगावी सोयीनुसार स्थानिक आघाड्या झाल्या, तरी गावपातळीवरचे सिंहासन राखण्यासाठी राजकीय वातावरण ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त चांगलेच तापले होते. अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत काही गावांत प्रस्थापितांना हादरे बसले. नव्या चेहऱ्यांना मतदारांनी संधी दिली.

Gram Panchayat Election Kavathe Mahankal
Raju Shetti : शेतकऱ्यांची दिवाळी होणार नसेल, तर कारखानदारांचीही होऊ देणार नाही; राजू शेट्टींचा रोखठोक इशारा

देशिंगमध्ये राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर राहावे लागले. माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाने परिवर्तन करत सत्तेची चावी हाती घेतली. अग्रण धुळगाव येथेही येथे राष्ट्रवादीचा पराभव झाला. माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाने परिवर्तन करत सत्ता आणली. इथे सामाजिक कामातून गाव जागृत करणारा तरुण शिवदास भोसले सरपंच झाला. माजी मंत्री घोरपडे गटाचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या मळणगाव येथे राष्ट्रवादीने माजी मंत्री घोरपडे गटाला चितपट करत २५ वर्षांनंतर सत्ताबदल करत सिंहासन काबीज केले.

करोली (टी) येथे राष्ट्रवादीला निसटता विजय मिळाला. कोकळे येथे तिरंगी लढतीत राष्ट्रवादीने पुन्हा एकदा सत्ता खेचून घेतली. दुधेभावीत सत्ताधाऱ्यांना पुन्हा सत्ता राखण्यात यश आले. ढोलेवाडी येथे झालेल्या दुरंगी लढतीत माजी मंत्री घोरपडे गटाने बाजी मारत राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवले. ढालगाव विभागातील अनेक गावांत सत्ताधाऱ्यांना पुन्हा सत्ता मिळवण्यात यश आले तरी काही गावात सत्ताधाऱ्यांना सत्तेतून दूर व्हावे लागले.

Gram Panchayat Election Kavathe Mahankal
Maratha Reservation : 'आरक्षणाला विरोध करणाऱ्या भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा'; मराठा समाज आक्रमक

तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत काही ठिकाणी सोयीस्कर आघाड्या झाल्या. प्रत्येक गावातील चित्र वेगळे होते. निकालानंतर काही गावात निवडणुकीत आघाड्या केल्यामुळे स्थानिक नेत्यांनी अद्याप कोणतीच भूमिका जाहीर केलेली नाही. २० ग्रामपंचायतींत निवडणुकीतून नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे.

Gram Panchayat Election Kavathe Mahankal
सुवर्णसौधमुळं बेळगाव सीमाप्रश्‍न संपुष्टात; विधान परिषदेच्या अध्यक्षांनी लावला जावईशोध, म. ए. समिती संपल्याचंही केलं वक्तव्य

भविष्यात हाच फॉर्म्युला राहणार का?

कवठेमहांकाळ तालुक्याच्या राजकारणात सुरू झालेल्या आघाड्यांमुळे भविष्यात होणाऱ्या निवडणुकांत हाच फॉर्म्युला राहणार का, हेही पाहणे औत्सुक्याचे आहे. निवडणूक निकालावरून तालुक्यातील राजकारण वेगळ्या दिशेने जाताना दिसते आहे. भविष्यात होणाऱ्या निवडणुकांत कोण कोणाशी आघाडी करणार, हे त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून राहणार आहे. सध्याच्या आघाड्यांच्या राजकारणामुळे गावपातळीवर स्थानिक नेत्यांसह कार्यकर्ते संभ्रमात पडलेले दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.