‘तासगाव’चे पुढील आमदार घोरपडेच : संजय पाटील

‘तासगाव’चे पुढील आमदार घोरपडेच : संजय पाटील
Updated on

कवठेमहांकाळ - तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून येत्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत अजितराव घोरपडे यांना आमदार करण्यासाठी आत्तापासूनच कामाला लागा, असे आवाहन खासदार संजय पाटील यांनी केले.

आगामी निवडणुकीत जिल्ह्यात सर्वच आमदार भाजपचे असतील असा विश्वासही व्यक्त केला. याप्रसंगी जिल्हा भाजपयुक्त करूया अशी भूमिका अजितराव घोरपडे यांच्यासह आमदार सुरेश खाडे, आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यासह अनेकांनी केली.

येथील बाजार समितीच्या भवनात खासदार संजय पाटील आणि आमदार पृथ्वीराज देशमुख यांचा सत्कार अजितराव घोरपडे यांच्या हस्ते झाला.

खासदार पाटील म्हणाले, ‘‘लोकसभेच्या निवडणुकीत गमतीजमती झाल्या. खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला. निवडणुकीपूर्वीच खासदार म्हणून फिरू लागले. भविष्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ हा भाजपच्या पक्षाच्या ताब्यात आणण्यासाठी मतदारसंघातून अजितराव घोरपडे यांना मोठ्या मताधिक्‍याने निवडून देण्यासाठी आपण जीवाचे रान करूया.’’    
पाच वर्षांत खासदार पाटील यांनी पायाला भिंगरी बांधली. जिल्ह्याच्या विकासासाठी रात्रंदिवस काम केले. कामाच्या बळावरच जनतेने त्यांना लोकसभेत पाठवले. त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. लोकसभा निवडणुकीत निवडणुकीच्या काळामध्ये तर्क-वितर्क काढले गेले. भविष्यात सांगली जिल्हा भाजपयुक्त करण्यासाठी सर्वांनी सर्व निवडणुका एकदिलाने यश प्राप्त करूया, अशी भूमिका माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी स्पष्ट करत खासदार पाटील यांना केंद्रामध्ये मंत्रीपद द्यावे आणि जिल्ह्याचा रखडलेला विकास पूर्ण करावा, अशी मागणी केली.

संजय पाटील यांच्या रूपाने एक कार्यक्षम खासदार लोकसभेत पाठवला. त्यामुळेच आपल्यावर पक्षाने एक मोठी जबाबदारी टाकून विधान परिषदेवर आपली वर्णी लावली आणि आपण केलेल्या कामाची बक्षीस म्हणून आमदारकी दिली यापुढेही जिल्ह्यात भाजप आणि भाजप हाच पक्ष असेल असा निर्धार अमदार पृथ्वीराज देशमुख यांनी व्यक्त केला. 

विधानसभेच्या निवडणुकीत आपण सर्वांनी काकांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यातील सर्वच्या सर्व विधानसभेच्या जागा भाजपच्या पारड्यात टाकूया आणि हा जिल्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुक्त करुया असे आव्हान आमदार सुरेश खाडे यांनी केले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नेहमीच जनतेला आणि कार्यकर्त्यांना फसवले आहे. केंद्रातील सरकारने दुष्काळी भागांना मोठा निधी उपलब्ध करून दिल्याने पाणी योजना मार्गी लावल्या. आता यंदाचा दुष्काळ हा शेवटचा ठरावा यासाठी खासदार संजय पाटील यांनी लक्ष घालवे, अशी मागणी अमरसिंह देशमुख यांनी केली. 

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पाटील, नेते मकरंद देशपांडे यांचेही भाषण झाले. कार्यक्रमास उपसभापती तानाजीराव पाटील, जिल्हा परिषद सदस्या आशाताई पाटील, पंचायत समिती उपसभापती सरिता शिंदे, माजी सभापती भारत डुबुले, विकास सोसायटीचे चेअरमन दिलीप झुरे, भाजपचे हायुम सावनूरकर, नगरपंचायतीचे बांधकाम सुनील माळी, कवठेमहांकाळ सभापती दादासाहेब कोळेकर, चंद्रकांत हाक्के, राजाराम पाटील, शिवाजीराव ताड, तुकाराम पाटील, दिलीप झुरे(ढालगाव), महावीर माने, बाबासाहेब पाटील, तात्यासाहेब नलवडे, पांडुरंग पाटील, अनिल लोंढे, उदय भोसले, रणजित घाडगे, सुनील पाटील, डॉ. विजय सावंत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.