जैनापूरजवळ जळालेल्या कारमध्ये आढळला ग्रेनाईट व्यावसायिकाचा मृतदेह; अपघात की घातपात? संशय बळावला

Chikkodi Police : फैरोज सुल्तानसाब बडगावी (वय ३७) रा. मुल्ला प्लॉट चिक्कोडी असे मोटारीत मृतदेह आढळलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.
Chikkodi Crime
Chikkodi Crimeesakal
Updated on
Summary

फैरोज हे मुल्ला प्लॉट येथील रहिवासी असून बाणंतीनकोडी रोडलगत त्यांचे ग्रॅनाईटचे मोठे दुकान आहे. फैरोज यांचे वडील हे हेस्कॉमचे नोंदणीकृत ठेकेदार आहेत.

चिक्कोडी : संकेश्वर-जेवरगी राज्य महामार्गावर (Sankeshwar-Jewargi Highway) चिक्कोडीपासून काही अंतरावर जैनापूरजवळ (Jainapur) राज्य महामार्गालगत जळून खाक झालेल्या मोटारीत चिक्कोडीतील ग्रेनाईट व्यावसायिकाचा मृतदेह आढळून आला. बुधवारी (ता. २) सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. चिक्कोडी पोलिस (Chikkodi Police) ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, अपघात की घातपात? याचा तपास सुरू आहे.

फैरोज सुल्तानसाब बडगावी (वय ३७) रा. मुल्ला प्लॉट चिक्कोडी असे मोटारीत मृतदेह आढळलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, संकेश्वर-जेवरगी राज्य महामार्गावर जैनापूर गावच्या हद्दीत बुधवारी पहाटे जळत असलेली मोटार काहीजणांना दिसून आली. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता मोटार संपूर्ण जळून खाक झाली होती. त्यावेळी त्या मोटारीत चालकाच्या सीटवर एक मृतदेह आढळून आला.

Chikkodi Crime
भिमनगरातील उर्दू हायस्कूलजवळ सराईत गुंडाचा निर्घृण खून; अशरफअलीचे दोन्ही हात मनगटापासून तुटले

अधिक चौकशी सुरू झाल्यावर ही मोटार चिक्कोडी येथील असल्याचे समजले. त्यानंतर व्यावसायिकाच्या घरातील नातेवाइकांनी धाव घेतली. मोटार व व्यक्ती आपली असल्याची खात्री झाल्यानंतर अधिक तपास सुरू करण्यात आला. मृतदेहही अधिक जळालेला असल्याने पोलिसांनी अधिक तपासासाठी फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले. राज्य महामार्गालगतच थोड्या अंतरावर खालच्या बाजूला ही मोटार व्यवस्थित पार्क केलेल्या स्थितीत होती.

तर, मोटारीच्या काचा रस्त्यावर पडलेल्या दिसल्या. मोटारीत चालकाच्या ठिकाणी बसलेल्या अवस्थेत मृतदेह तसाच होता. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीनंतर घडली असावी, असा पोलिसांचा संशय आहे. घटनास्थळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्रृती, चिक्कोडीचे पोलिस उपाधीक्षक गोपाळकृष्ण गौडर, मंडल पोलिस निरीक्षक विश्वनाथ चौगुला, उपनिरीक्षक बसनगौडा नेर्ली यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेची माहिती मिळताच विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनीही भेट देऊन माहिती घेतली.

Chikkodi Crime
देवगडमध्ये तब्बल एक कोटीची व्हेल माशाची उलटी जप्त; 'उलटी'ची किंमत कशाच्या आधारावर ठरवली जाते?

घातपाताचा संशय

घटनास्थळी अपघातासारखी स्थिती दिसत नसल्याचे फैरोज बडगावी यांचे नातेवाईक सांगत होते. मोटार व व्यक्ती आपलीच असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मंगळवारी रात्री बोलणे झालेले असताना सकाळी ही घटना उघडकीस आल्याने कुटुंबीयांनी याबाबत शंका व्यक्त केली आहे. याचा सविस्तर तपास करावा. या घटनेबद्दल संशय असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे.

नामांकित व्यापारी

फैरोज हे मुल्ला प्लॉट येथील रहिवासी असून बाणंतीनकोडी रोडलगत त्यांचे ग्रॅनाईटचे मोठे दुकान आहे. फैरोज यांचे वडील हे हेस्कॉमचे नोंदणीकृत ठेकेदार आहेत. तर बंधू हेस्कॉममध्ये सहायक कार्यकारी अभियंते आहेत. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.