कोरोना बाधितांच्या निधीसाठी कलाशिक्षकाची अशीही धडपड

कोरोना बाधितांच्या निधीसाठी कलाशिक्षकाची अशीही धडपड
Updated on

गोंदवले (जि. सातारा)  :पेशाने कलाशिक्षक असले तरी अंगी असलेल्या नाना कलेतुन साताऱ्याच्या अभिजित वाईकर यांनी सध्याचा आपत्ती काळात लोकांसाठी मनोरंजनाची मेजवानी दिली आहे. लॉकडाऊन काळात लोकांनी घरीच थांबावे यासाठी यु ट्यूब व फेसबुक च्या माध्यमातून ते लोकांचे मनोरंजन करत आहेत.विविध कलास्पर्धेचे आयोजन करून कोरोना बाधितांसाठी निधी मिळविण्याची धडपड या अवलिया कडून सुरू आहे.

साताऱ्याच्या लोकमंगल हायस्कुलमध्ये कलाशिक्षक असणारे अभिजित वाईकर हे गेल्या बावीस वर्षांपासून नाट्य क्षेत्रातही आघाडीवर आहेत.केवळ अभिनयच नव्हे तर नाट्य लेखन,दिग्दर्शन आणि नव कलाकारांना मार्गदर्शन असे विविधांगी गुण त्यांच्यात पाहायला मिळतात.आत्तापर्यंत त्यांनी 'कधी उलट कधी सुलट','आम्ही अजून आहोत म्हटलं','नजरकैद','एके दिवशी काय झाले','नाथ हा माझा'आदी नाटकांमध्ये भूमिका तसेच काहींचे लेखन आणि दिग्दर्शन देखील केलं आहे. रसिकांच्या मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न ते करत आहेत.म्हणूनच सुमारे १६५ सदस्य असलेल्या मधूमिता सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून कार्यरत आहेत.आर्थिक दुर्बल कलाकारांना मदतीचा हात देणाऱ्या अभिजीत सरांनी  नाटक, एकांकिका तसेच शॉर्ट फिल्म मध्येही उत्तम कामगिरी केली आहे.नाट्य,चित्रपट,टीव्ही मालिका,वेब सिरीज मध्ये अनेक कलाकारांना संधी मिळवून दिली आहे. मधूमिता मुव्हीज युट्युब चॅनेलच्या माध्यमातून नाट्यकला , दृकश्राव्य कला वाढविण्यासाठीचा त्यांचा प्रयत्न आहे.
 
सध्या मात्र कोरोनामुळे या सर्वच कामांमध्ये बाधा आली आहे.सर्वच शो बंद असल्याने कलाकार आपापल्या घरीच आहेत.अशा कलावंतांच्या कलेला वाव मिळावा आणि लॉकडाऊन काळात रसिकांनीही घरी थांबूनच मनोरंजनाचा लाभ घ्यावा यासाठी अभिजित यांनी आता समाजिक बांधिलकीतून काम सुरू केले आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकारांना आवाहन केल्यानंतर त्यांना भरघोस प्रतिसाद देखील मिळत आहे.घरातूनच यु ट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून गेल्या महिनाभरापासून त्यांचा हा उपक्रम सुरू आहे.यासाठी पत्नी शिल्पा आणि कन्या मधूमिता यांचे सहकार्य मिळत आहे. केवळ नाट्यकला नव्हे तर चित्रकला, वादन, पाककला, जादूचे प्रयोग ,गायन,स्वगत, कविता वाचन, नाट्य अभिवाचन, एकपात्री अभिनय, नृत्य अशा विविध ५० कलांचा यात समावेश आहे.त्यामुळे या काळात 'लॉकडाऊन टॅलेंट शो' चे 10 पेक्षा जास्त एपिसोडस पूर्ण झाले आहे.

कलाकारांच्या सुप्त गुणांना वाव देण्याबरोबरच रसिकांनी घरातच थांबावे यासाठी त्यांचा हा प्रयत्न सुरू आहे.आता या रोजच्या हायटेक शो मधून सर्व कलाकारांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे श्री वाईकर यांनी सांगितले.या स्पर्धेतून गोळा होणाऱ्या रक्कमेतून कोरोना पीडितांसाठी मदत करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव हद्दपार करण्यासाठी 'स्टे टू होम' गरजेचे असून विविध कलांच्या हायटेक सादरीकरणातून करत असलेल्या प्रयत्नाला यश मिळत आहे.

अभिजित वाईकर, अभिनेता व रंगकर्मी,सातारा.

ऋषी कपूर म्हणजे जॉली माणूस...


साेनके, तरडगावला काेराेनाबाधित आढळले; साताराची चिंता वाढली - 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.