कऱ्हाड : कोरोनोच्या पार्श्वभूमीवर शहरातील जंतुनाशक औषध फवारणी बंद आहे. त्यावरून पालिकेत गोंधळ उडाला आहे. यशवंत विकास व लोकशाही आघाडीने नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनीही नगराध्यक्षांना दोषी धरून खुलासा केला आहे. विनाकरण टार्गेट करून आपली नाहक बदनामी केली जात असल्याचे नगराध्यक्षांचे म्हणणे आहे. या एकूण परिस्थितीत दररोज नवनवीन होणारे आरोप-प्रत्यारोप चर्चेचे ठरत आहेत.
"यशवंत' आघाडी आक्रमक
यशवंत विकास आघाडीने नगराध्यक्षांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. आघाडीने दिलेल्या माहितीनुसार कोरोनासारख्या काळात पडेल ते काम करण्यासाठी सत्तारूढ आघाडीचे नेते राजेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नगरसेवक स्वखर्चाने औषध फवारणीसह अन्य मदतीसाठी प्रयत्न करताहेत. त्याचवेळी नगराध्यक्षांच्या आडमुठ्या धोरणाने प्रशासनाला काम करणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे रोहिणी शिंदे यांच्या विरोधात नगरविकास खाते, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहोत, अशी भूमिका आघाडीने घेतली आहे. संकटावेळी वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी वावरणे आवश्यक आहे. कोरोनाची झळ कऱ्हाडकरांना लागू नये यासाठी राजेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला आहे. स्वखर्चाने औषध फवारणी सुरू केली आहे. त्यासाठी दोन फवारणी मशिन लावल्या आहेत. भाजीपाला, फळे व जीवनावश्यक वस्तू या दारात मिळाव्यात, यासाठी नियोजन केले. साफसफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची व्यवस्था केली. क्वारंटाइन करण्यासाठी शहराबाहेर 40 बेडची व्यवस्था केली आहे.
विरोधकांकडून टार्गेट ः शिंदे
नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनाही टार्गेट केले जात असल्याचा खुलासा केला आहे. त्या म्हणाल्या, ""कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून शहरात फिरून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. अधिकाऱ्यांशी वेळोवेळी संपर्कात राहून आदेश दिले आहेत. औषध फवारणीवेळी स्वतः गाडीबरोबर फिरून फवारणी कशी होते, याची पाहणी केली आहे. हॅंड पंप, पाइप दुरुस्त करून घेतलेत. औषध फवारणी थांबवू नये, असे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र, काही लोक मुद्दाम नाहक चर्चा घडवत आहेत. एका कागदावर स्वाक्षरी केली नाही म्हणून औषध फवारणी थांबली आहे, अशी खोटी आवई उठवून घाणेरडे राजकारण खेळण्याचा प्रकार केला आहे. या सर्व हीन प्रकाराचा मी तीव्र शब्दात निषेध करते. बिकट व संकटकाळात कधीच खालच्या पातळीवर जाऊन वागले नाही, वागणारही नाही.''
नगराध्यक्षांकडून मुळ मुद्याला बगल ः डांगे
नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी उपाययोजनांच्या कामावर स्वाक्षरी केली नाही, ही बाब बाजूला ठेवून त्या मूळ विषयाला बगल देत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जंतुनाशक फवारणीसह काही उपाययोजना करायच्या आहेत, त्यासाठी निविदा काढणे आवश्यक आहे म्हणून शासनाने निविदा काढण्यासाठी नगराध्यक्षांच्याकडे मान्यता मागितली होती. ती मान्यता त्यांनी दिलेली नाही. त्या मूळ मुद्द्याला बगल देत आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी दिली.
त्याच्या नरड्यावर सुरी फिरणार ताेच सायरन वाजला अन्...
पाेरांच्या करामतींमुळे गावागावांत थरथराट चित्रपटाच्या आठवणींना मिळू लागला उजाऴा
लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांची उद्धव सरकारपुढे आर्त हाक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.