मल्हारपेठ (जि.सातारा) ः उरुल येथील दोघांना लांडोरच्या शिकारप्रकरणी वन विभागाने ताब्यात घेतले. विनायक बाळासाहेब निकम (वय 42) व राहुल बाळासाहेब निकम (वय 41, दोघे रा. उरुल) अशी संबंधित संशयितांची नावे असून त्यांच्याकडून डबलबार बंदूक, एक मोटारसायकल व मृत लांडोर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधितावर वन्यजीव कायद्याद्वारे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वन विभागाने दिली.
वन विभागाने दिलेली माहिती अशी ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी असताना अनेक ठिकाणी हुल्लडबाजांकडून पार्ट्या केल्या जात आहेत. काहीजण रात्रीच्या वेळेस डोंगरामध्ये जाऊन पार्ट्यासाठी जंगली प्राणी, पक्ष्यांची शिकार करण्याचे प्रमाण वाढले आहे. काल रात्री वन विभागास संबंधित दोघे शिकारीस गेल्याची माहिती मिळाली.
मल्हारपेठ वन विभागाचे वनपाल संजयकुमार भाट, वनरक्षक रामदास घावटे परिसरात गस्त घालत असताना सायंकाळी सातच्या सुमारास त्यांना बंधाऱ्याकडून बंदुकीच्या गोळ्या झाडल्याचा आवाज आला. त्यानंतर तत्काळ संबंधित अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केल्यावर त्यांना दाट झाडीत मृत लांडोर आढळून आली. त्याप्रकरणी विनायक निकम व राहुल निकम यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून एक दुचाकी, एक डबलबार बंदूक, मृत लांडोर जप्त करण्यात आली आहे. वनसंरक्षक भरतसिंह हाडा, सहायक वनसंरक्षक किरण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटणचे वनक्षेत्रपाल विलास काळे, वनपाल संजय भाट, वनरक्षक रामदास घावटे, दादाराव बर्वे, विलास वाघमारे, वनकर्मचारी यांनी ही कारवाई केली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
उद्योगांबाबत हवी शिथिल भूमिका; लॉकडाउनबाबत सकाळच्या भूमिकेचे मासच्या पदाधिकाऱ्यांकडून स्वागत
सातारा जिल्ह्यात लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 31 लाख 71 हजार दंड वसूल
सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 13 मार्च पासून आज 11 एप्रिल अखेर लॉकडाउन उल्लंघनाच्या एकूण 12253 घटनांची नोंद झाली असून 465 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर प्रतिबंधात्मकतेच्या विविध कारवाईमध्ये मोटारवाहन कायद्यासह एकूण 31 लाख 71 हजार 400 इतका दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.
लॉकडाउनचे उल्लंघन केलेल्या विविध कारवाईमध्ये एकूण 81 जणांना अटक करण्यात आली असून आज अखेर 2 हजार 549 वाहने जप्त करण्यात आली आहेत.
Coronafighters : त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी ग्रामस्थांकडून पुष्पवृष्टी
त्याच्या नरड्यावर सुरी फिरणार ताेच सायरन वाजला अन्...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.