...म्हणून झाली 30 हजारांवरून रुग्णसंख्या पाच हजार

...म्हणून झाली 30 हजारांवरून रुग्णसंख्या पाच हजार
Updated on

सातारा : केस पेपरसाठी लागलेल्या रांगाच्या रांगा, डॉक्‍टरांच्या खोली बाहेर उभे असलेले रुग्ण, रक्त किंवा सोनोग्राफीच्या तपासणीसाठी चाललेली धावपळ जिल्हा रुग्णालयातील हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. लॉकडाउनच्या महिनाभराच्या कालावधीत जिल्हा रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या 80 टक्‍क्‍याने घटली आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या भीतीने जिल्हा रुग्णालय... रुग्ण नको रे बाबा असे जणू म्हणताहेत असे चित्र निर्माण झाले आहे.
 
तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि उपचारासाठी जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना जिल्हा रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग हा जणू संजीवनीसारखा काम करत असतो. खासगी दवाखान्यातील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या फी व औषधांचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर असतो. त्यामुळे बहुतांश लोक जिल्हा रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात उपचारासाठी येत असतात. नागरिकांची ही गरज ओळखून शासनानेही सकाळच्या एक वेळी सुरू असणारा बाह्य रुग्ण विभाग सायंकाळी चार ते सहा या वेळेतही सुरू केला. त्याचा नागरिकांना फायदाच होत होता. दहा रुपयांच्या केस पेपरवर त्यांना उपचार व औषधही मिळत होती. त्यामुळे हृदयरोग, मधुमेह, कर्करोग, मानसिक आजार यांसह विविध आजाराने ग्रस्त असलेले नागरिक मोठ्या संख्येने जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधेचा लाभ घ्यायला येत होते. "लॉकडाउन' पूर्वी रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे केस पेपर व औषध देण्याच्या विभागामध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांना स्वत: लक्ष घालून जादा रांगांची सुविधा निर्माण करावी लागली होती.
 
आज संपूर्ण देशभरासह जिल्ह्यात लागू झालेल्या "लॉकडाउन'ला महिना पूर्ण होत आहे. या कालावधीत जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतुकीच्या सर्व व्यवस्था बंद करण्यात आलेल्या आहेत. केवळ अत्यावश्‍यक सेवेमध्ये असलेल्या नागरिकांनाच दुचाकी किंवा चारचाकी वाहन घेऊन बाहेर पडण्यास परवानगी आहे. अत्यावश्‍यक सेवेतील दुकानेही केवळ काही काळ उघडण्यास परवानगी आहे. या निर्बंधांमध्ये दवाखान्यांमध्ये जाण्यास नागरिकांना सूट देण्यात आली आहे; परंतु गेल्या महिनाभरात राज्यासह जिल्ह्यात दरराजे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. बाधितांच्या जवळच्या संपर्कात असलेल्या नागरिकांनाही जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधितांच्या तपासणीसाठीही बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात आलेला आहे. कोरोना रुग्ण व संशयितांच्या उपचारावरील जिल्हा रुग्णालय हे एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे. त्याचा परिणाम साहजिकच अन्य आजारांच्या रुग्णांच्या मानसिकतेवर झालेला दिसून येत आहे. 

हॅलाे...यांचे हे राेजचेच सुरु आहे...थकले आता मी...काय करु

30 हजारांवरून पाच हजारांवर रुग्णसंख्या 

लॉकडाउन सुरू होण्यापूर्वी जिल्हा रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात दररोज एक हजार ते 1200 रुग्ण उपचारासाठी येत होते. त्यामुळे महिन्याला सुमारे 30 हजार रुग्णांवर या ठिकाणी उपचार केले जात असत. यातील अनेक जण महिन्याच्या औषधांसाठीही वर्षानुवर्ष येणारी आहेत. मात्र, लॉकडाउनच्या संपूर्ण महिन्यात सुमारे पाच हजार 600 रुग्णांनीच जिल्हा रुग्णालयाचा रस्ता धरल्याचे दिसून येत आहे. दिवसाला हे प्रमाण हजार- बाराशेवरून शंभर- दिडशेवर आले आहे. म्हणजे सुमारे 80 टक्के रुग्णांनी या कालावधीत जिल्हा रुग्णालयाकडे पाठ फिरवल्याचे दिसते. त्यामुळेच "लॉकडाउन'च्या या काळात कोरोनाच्या धास्तीने जिल्हा रुग्णालय... नको रे बाबा अशी मानसिकता शहरासह जिल्ह्यातील नागरिकांची झालेली दिसून येत आहे. 

महाबळेश्वर : ...अखेर वाधवानांची इच्छा पुर्णत्वास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.