रेशनिंग आणायला जाता ? मग आधी हे वाचा...

रेशनिंग आणायला जाता ? मग आधी हे वाचा...
Updated on

सातारा : समाजातील गरीब गरजूंना मदत व्हावी, एकही माणूस उपाशी राहू नये यासाठी शासनाने रेशनिंगची दुकाने सुरू केली. मात्र अनेक दुकानदार नागरिकांची विविध प्रकारे अडवणूक करतात. अनेक लाभार्थीना शासनाने नियम, ग्राहकांना त्याचे शासनाने दिलेले हक्क माहिती नसतात. त्याचा गैरफायदा काही दुकानदार घेतात. यासाठी नागरिकांना नियम आंणि हक्क माहित असलेच पाहजिते. काय आहे हे हक्क हे आपण जाणून घेऊयात.

रेशन ग्राहकांसाठी ही माहिती आपल्या जवळ ठेवावी. जेणेकरुन ज्यावेळी तुम्ही रेशनींग आणायला गेला अथवा नाही आणले तरी तुम्ही जागरुकता दाखवू शकता.
रॉकेल/घासलेट पहिल्‍या पंधरवड्यात न घेतल्‍यास महिना अखेरपर्यंत घेता येते. हप्‍ता बुडत नाही. बीपीएल् व अंत्‍योदयचे धान्‍य गेल्‍या महिन्‍यात न घेतल्‍यास पुढच्‍या महिन्‍यातही घेता येते. बीपीएल् व अंत्‍योदयचे धान्‍य महिन्‍यात चार हप्‍त्‍यातही घेता येते. रेशनवर घेतलेल्‍या वस्‍तूंची पावती मिळालीच पाहिजे. पावतीवर रेशन दुकानाचा क्रमांक असतो. एका दिवशी एकच पावती फाडता येते असा नियम नाही. ज्‍या व जेवढ्या वस्‍तू हव्‍या असतील तेवढ्याच वस्‍तू आपण घेऊ शकतो. इतर गोष्‍टी घेतल्‍याशिवाय रॉकेल मिळणार नाही असे दुकानदार म्‍हणू शकत नाही. रेशनकार्ड स्‍वतःकडे ठेवून घेण्‍याचा किंवा ते रद्द करण्‍याचा अधिकार दुकानदाराला नाही.

रेशन दुकान रोज सकाळी चार तास व सायंकाळी चार तास उघडे असलेच पाहिजे. आठवडी बाजाराच्‍या दिवशी उघडे असले पाहिजे. आठवड्यातून एकदाच दुकान बंद ठेवता येते. रेशन दुकान जर आठवड्यातून एक दिवसाहून अधिक दिवस बंद रहात असेल तर त्या बंद दुकानाची छायाचित्रे / चलचित्रे तारीख वेळे सहित http://mahafood.gov.in/pggrams/ या ऑनलाईन लिंकवर अपलोड करावीत. सिद्धता पडताळून दुकानदारावर तात्काळ कारवाई होते. रेशन दुकानात लोकांना स्‍पष्‍टपणे वाचता येईल असा महिती फलक असला पाहिजे. या फलकावर दुकानाची वेळ, सुटीचा दिवस, दुकान क्रमांक, तक्रार वही उपलब्‍ध असल्‍याची नोंद, रेशन कार्यालयाचा पत्‍ता व फोन, रेशनकार्ड संख्‍या, भव व देय प्रमाण उपलब्‍ध कोटा ही माहिती असणे अनिवार्य असते.

बीपीएल, अंत्‍योदय व अन्‍नपूर्णा लाभार्थ्‍यांची यादी दुकानात लावलेली असते. वरीलपैकी कोणतीही गोष्‍ट आपल्‍या गावातल्‍या रेशनदुकानात होत नसेल, तर ताबडतोब लेखी तक्रार नोंदवा. जर गावातील रेशन दुकानदार धाक/धमकी दाखवत दांडगेशाही करून तक्रार करण्यास मज्जाव करत असेल तर त्रासलेल्या ग्राहकांनी गुप्तता राखून एकत्रितपणे लेखी अर्जावर आपली नावे आणि सही करून तो रजिस्टर पोस्टाने तहसिल कार्यालयाला पाठवा. तसेच दुकानातच तक्रारवही ठेवलेली असते. ती वही मागा आणि त्‍यात आपली तक्रार लिहून त्‍याखाली नाव, पत्‍ता, सही/अंगठा करा. जर दुकानदाराने ही वही दिली नाही, तर तहसिलदाराकडे वही न देण्‍याची तक्रार करा. तक्रारवही न देणे हा अदखलपात्र गुन्‍हा म्‍हणून तहसिलदार कारवाई करतात. तक्रारवहीत पाच तक्रारी नोंदल्‍या, की दुकानदाराला 15 हजार रूपये दंड होतो.

शाब्बास ! अखेर रेशनचा काळाबाजार उघडकीस
 

दहा महिन्यांच्या बाळाच्या पॉझिटिव्ह रिपाेर्टमुळे मंत्रीही चिंतेत

दुकानावर देखरेख करण्‍यासाठी ग्राम पंचायतीची दक्षता समिती असते. या समितीत जागरूक तरुणांनी सहभागी झाले पाहिजे. ग्रामसभेत या समितीविषयी चर्चा करा. गरज असेल, तर समिती बदला. ही समिती दुकानावर धाड घालू शकते. गैरप्रकार असतील, तर दुकानाला टाळेही लावू शकते. तलाठी या समितीचा सदस्‍य सचिव असतो.

आपण आपल्या गावात रेशन दुकानातुन रेशन घेतो. परंतु रेशन दुकानदार आपल्याला पावती मात्र देत नाही. म्हणुन महाराष्ट् शासनाने लोकांना त्यांच्या पावत्या या ऑनलाईन देखील पाहता येण्यासाठी खालील वेबसाईट चालु केलेली आहे. आपण त्या वेबसाईटवर जाऊन आपला आरसी नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकावा. महाराष्ट् सरकारने जनतेस आवाहन केलेले आहे आपण खालील वेबसाईट वर जाऊन आपले रेशनकार्ड वरील धान्य चेक करावे.

आपले रेशनकार्ड चेक करण्यासाठी खालील लिंक वर आरसी नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकुन आपण आपली पावती प्राप्त करु शकतो. या साईटवर जाऊन आपल्या कार्डावर एका व्यक्तिमागे किती धान्य आपल्याला मिळण्याचा अधिकार आहे आणि दुकानदार किती देतो याची आपणास ऑनलाईन माहिती मिळते.

CoronaFighters : ते नेहमीच आमच्यासाठी जीवावर उदार होऊन आपली सेवा बजावतात

Video : त्यांना इश्‍काचा गुलकंद पडला महागात


अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाचा वापर करा
https://mahaepos.gov.in/SRC_Trans_Int.jsp

रेशन दुकानदारांचा FPS ID चेक करण्यासाठी खालील लिंक वर पहावे. किंवा आपल्या पावतीवर देखील आयडी असतो.
https://mahaepos.gov.in/FPS_Trans_Abstract.jsp

रेशन दुकानदारानी शासनाकडुन किती माल घेतला हे खालील लिंक वर पहावे
https://mahaepos.gov.in/FPS_Status.jsp

रेशनदुकानदारा विरुध्द तक्रार देण्यासाठी खालील लिंक वर पहावे.
http://mahafood.gov.in/pggrams/

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.