कऱ्हाड (जि. सातारा) ः कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या कऱ्हाड तालुक्याची लागण शहरात पोचू नये, यासाठी पालिकेसह उपजिल्हा रुग्णालयात 24 तास लढा सुरू आहे. पालिकेचे 325 आरोग्यसेवक, तर वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील सुमारे 100 जणांचा स्टाफ 24 तास ड्युटीवर आहेत. रुग्णालयातही सफाई कर्मचाऱ्यांपासून ते डॉक्टर्सपर्यंत सर्व जण अलर्ट आहेत. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस स्टाफ दीड महिन्यापासून 24 तास कार्यरत आहे.
मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाने स्वच्छतेचे वेळापत्रक तयार केले आहे. त्यात रस्त्याची सफाई, गटारांची स्वच्छता, जंतुनाशक फवारणी, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता, कचऱ्याबाबत जागृकतेला महत्त्व देत एकसूत्री कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यात पालिकेतील 325 आरोग्य सेवक हे 24 तास रस्त्यावर आहेत. कोरोनाने मृत्यू आलेल्यांवर अंत्यसंस्कारही पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडूनच होत आहेत. पालिकेच्या 18 कचऱ्याच्या गाड्यांवर दोन कर्माचारी व जादा चार कर्मचारी नेमले आहेत. रस्ता झाडण्यासाठी 150 महिलांची ड्युटी लावली आहे. रस्त्याच्या सफाई व गटारांच्या स्वच्छतेसाठी 50 कर्मचारी आहेत. सहा कर्मचारी नियमित फवारणीला आहेत. शहरातील विविध भागांत सॅनिटायझर फवारणीला तीन वाहनांसह सात पथकांची नेमणूक केली आहे. वाढीव हद्दीसह मूळ शहरातही एकाच वेळी फवारणी सुरू आहे. कामाच्या नियोजन व देखरेखीची जबाबदारी 10 मुकादमांवर आहे. शहरातील 23 सार्वजनिक शौचालये दररोज स्वच्छ केली जातात.
येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू आहे. तेथे 10 डॉक्टर्स, सात नर्सेस, फार्मासिस्ट आहेत. रुग्णालयातील डॉक्टर्स पार्ले येथे विलगीकरण कक्षात ठेवलेल्या संशयितांची दोन वेळा तपासणी करतात. या कक्षाची स्वच्छता उपजिल्हा रुग्णालयातील सफाई कर्मचारी करतात. तेथे डॉक्टर, नर्सेस, तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम टीम, सफाई कर्मचारी सतत कार्यरत आहेत. जंतू प्रतिबंधक उपाययोजना, आरोग्य प्रशिक्षण देणे आदींसाठी पथक आहे.
कोरोनासाठी त्रिस्तरीय रचना
कोरोनासाठी त्रिस्तरीय रचना केली आहे. त्यात कोरोना केअर सेंटर, कोरोना हेल्थ सेंटर व कृष्णा कोविड रुग्णालय आहे. कोविड रुग्णांची ओपीडी वेगळी करण्यात आली आहे. पार्ले येथील कोरोना केअर सेंटरमध्ये 150 बेड आहेत. कोरोनासह इतर रुग्णांसाठी डॉक्टर्स, नर्सेस उपलब्ध आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.