कऱ्हाड तालुक्याला सकाळ सकाळी हादरा

कऱ्हाड तालुक्याला सकाळ सकाळी हादरा
Updated on

कऱ्हाड : सातारा जिल्ह्यात आज (मंगळवार) आठ रुग्णांचे अहवाल पाॅझिटेव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील काेराेना बाधितांची संख्या 146 इतकी झाली आहे. या आठ पैकी कऱ्हाड तालुक्यातील म्हसोली येथील पाच जणांचा समावेश असल्याचे तपासणी अहवालातुन समोर आले आहे. त्यामुळे तेथे आता कोणाची नवी साखळी निर्माण होऊ लागली आहे. कऱ्हाड तालुक्यातील कोरोनाबाधित संख्या वाढून 101 झाली आहे. कराड तालुक्यात बधितांची संख्या वाढू लागल्याने सातारा जिल्ह्यात पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यात आठ रुग्णांचे अहवाल पाॅझिटेव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील काेराेना बाधितांची संख्या 146 इतकी झाली आहे.

कऱ्हाड तालुक्यात कोरोना बाधीत रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढु लागले आहे. तालुक्यात पहिला रुग्ण तांबवे येथे सापडला. त्यानंतर म्हारुगडेवाडी येथे मुंबईवरुन आलेला रुग्ण सापडला. त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्य झाला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील अन्य एकाला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यानंतर हजारमाचीत रेल्वेचा कर्मचारी बाधीत म्हणुन सापडला. त्यानंतर चरेगाव आणि बाबरमाची येथे दोन रुग्ण सापडले. त्यानंतर तालुक्यातील वनवासमाची आणि आगाशिवनगर येथील कोरोनाची बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. तेथे संबंधित ठिकाणी कोरोनाची साखळीच सुरू झाल्याचे दिसत आहे. तेथील रुग्ण सर्वाधिक असल्यामुळे दोन्ही ठिकाण कोरोनासाठी हॉटस्पॉटच झाली होती. त्यानंतर कापील, रेठरे बुद्रुक,  कामेरी,  तांबवे, गमेवाडी आदी गावातील बाधित रुग्णांची त्यात भर पडली.

उंडाळे विभागातील म्हसोली येथील एका रुग्णाला बाधा झाली. त्यानंतर आणखी दोन पॉझिटिव कोरोना बाधित त्याच गावात सापडले. अशातच आज (मंगळवारी) आणखी पाच रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये तीन पुरुष व दोन महिलां रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्याची चिंता आणखीच वाढली आहे. संबंधित ठिकाणी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, पोलिस उपाधिक्षक सुरज गुरव, कराड तालुका पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, तालुका आरोग्य अधिकारी संगीता देशमुख, येवती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासह आरोग्य विभाग आणि पोलिस यंत्रनेणे आवश्यक ती उपाययोजना हाती घेतल्या आहेत. दरम्यान कराड तालुक्यातील पाच व्यतरिक्त अन्य रुग्ण खटाव आणि खंडाळा येथील बाधित रुग्ण असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे.

धक्कादायक ः पोटच्या मुलाचा मृतदेह तीन दिवस घरातच ठेवला लपवून 

खून झालेल्या अमरावतीच्या कामगाराचे नातेवाईकच सापडेनात

ठाकरे सरकार लक्ष देईना; शेतकऱ्यांच्या डाेळ्यांत अश्रु

अचानक त्यांच्या डोळ्यासमोरच निम्मे घर कोसळले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.