कोरोनाबाधीतेची रुग्णालयात हेळसांड; नातेवाईकांचा उद्रेक

कोरोनाबाधीतेची रुग्णालयात हेळसांड; नातेवाईकांचा उद्रेक
Updated on

कऱ्हाड ः कोरोना बाधीत रूग्णांसाठी उपजिल्हा रूग्णालयात सुविधाच नसतील, तर रूगेण ठेवता तरी का, असा सवाल तीच्या नातेवाईकांनी संतप्तपणे केला. त्यांना वेळेवर जेवण मिळत नाही. वॉर्डात स्वच्छतेचा अभाव आहे. रूग्णांकडे नीट लक्ष न दिल्याने त्यांच्यावर वेळेत उपचार होताना दिसत नाहीत. त्यामुळे रूग्णांचे नातेवाईकांसह क्वारंटाईन केलेलेही वैतागले आहेत. येथील वाखाण भागातील उपजिल्हा रूग्णालयातून कोरोनाबाधीत महिलेच्या नातेवाईकांच्या दबामुळे आज (रविवारी) दुपारी त्या महिलेस कृष्णा रूग्णालयात वर्ग केले. त्यावेळी उपजिल्हा रूग्णालयातील हालगर्जीपणा अधिक स्पष्टपणे समोर आला. तज्ञ डॉक्टांराचा अभावासह अनेक असुविधाही येथे आहेत. कोरोनाबाधीत रूग्णांना तपासणाऱ्या डॉक्टर्ससह नर्सनाही योग्य ती साधने दिलेली नाहीत, असा आराेप नातेवाईकांचा आहे. कोरोनाच्या रूग्णांना येथील उपजिल्हा रूग्णालयात आवश्यक त्या सुविधा मिळत नाहीत हे आज रुग्णांच्या नातेवाईकांमुळे समाेर आले आहे.

शहरातील वाखाण भागात महिलेस कोरोनाची लागण झाली. ती येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल होती. तिच्यावर उपजिल्हा रूग्णालयात उपाचार सुरू होत. मात्र त्यात हालगर्जीपणा झाल्याने तिचे नातावेईक अक्षरशः वैतागले होते. दोन दिवसात उपजिल्हा रूग्णालयात त्या महिलेकडे कोणीही व्यवस्थीत लक्षही दिले नाही. वैतागलेल्या त्या महिलेच्या नातेवाईकांनी उपजिल्हा रूग्णालायातील आज प्रत्येकावर दबाव आणला. त्यासाठी त्यांनी तेथील डॉक्टारांवरही प्रश्नांचा भडीमार केला. कोरोना सारख्या आजारात हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयातील सर्वांनाच त्या नातेवाईकांनी फैलावर घेतले. त्या भागातील काही स्थानिक लोकप्रतिनिधीही तेथे आले. त्यांनाही सुविधा नसतील तर येथे रूग्ण ठेवताच का, असा सवाल केला. संबधित महिलेच्या नातेवाईकांनी दबाव आणल्याने त्या महिलेला अखेर दुपारी दोननंतर कृष्णा रूग्णालयात हलविण्यात आले.

वास्तिवक उपजिल्हा रूग्णालयात असुविधा होत्या. तेथे रूग्णांच्या उपचाराची सोय नव्हती तर कोरोनाबाधीत रूग्णांना ठेवलेच का, असा प्रश्न नातवाईकांसह जनता विचारु लागली आहे.  येथे विलगीकरण कक्ष आहे. त्या विलगीकरण कक्षातही अनेक रूग्ण आजही ठेवले आहेत. तेथेही सुविधांचा वानवा आहे, असेही तेथे दाखल असलेल्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

याबाबत माजी नगरसेवक आनंदराव लादे यांनाही त्या सगळ्याकडे लक्ष वेधत तेथे होणाऱ्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष वेधले आहे. लादे यांनी त्याबाबत लेखी तक्रार प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे दिली आहे. लादे म्हणाले, उपजिल्हा रूग्णालायत अत्यंत चुकीच्या पद्धतीने काम सुरू आहे. तेथील अधीक्षक कोणाचे ही एेकत नाहीत. कोविड रूग्ण असतानाही ते लसीकरण घेतात, ही साफ चुकीची बाब आङे. कोविडचे रूग्ण असतानाही अत्यावश्यक काळजी घेण्यात त्यांनी हालगर्जीपणा केला आहे. त्याशिवाय ते उपजिल्हा रूग्णालयातील कर्मचारी, डॉक्टर्स अन अन्य लोकांसह शहरातील नागरीकांच्या जीवीशी खेळत आहेत. त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी. 

लग्नापुर्वीच जाेडीने महाराष्ट्रात धमाल उडवून दिली; सुप्रिया सुळेही खूष 

कलावंत म्हणतात...पोटासाठी नाचायचेय; पण...

ना काम, ना दाम, घराची वाट अजूनही लांब... 


परवानगी दिली कशी याचीही चौकशी व्हावी...

वेणूताई उपजिल्हा रूग्णालायातील पाच आरोग्ये सेविका व एका कर्माचऱ्यास कोरोना झाला. त्यातही रूग्णालायाचा हलगर्जीपणा व बेजबाबदारपणा स्पष्ट होतो. त्यातील एका आरोग्य सेविका सातारहून ये-जा करत होती. तिलाही परवानगी कोणी व कशी दिली, त्याचीही चौकशी होण्याची गरज आहे.

दरम्या वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात आज (रविवार) घडलेल्या काराबाबत वैद्यकीय अधिक्षक प्रकाश शिंदे यांच्या संपर्क साधला असता ते म्हणाले कोरोना बाधीत महिलेला कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी वर्ग केले आहे. तीची प्रकृती स्थीर आहे. मात्र तिच्या नातेवाईकांनी केलेल्या मागणीनुसार तिला उपचारासाठी वर्ग करण्यात आले आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षामध्ये संबंधित महिला एकटीच होती. अशावेळी मानसिक तणावाखाली येणे स्वाभाविक असते. तेच तिच्या बाबतीत झाले. तिला सर्व सुविधा योग्य पद्धतीने मिळत होत्या. मात्र पहिल्या दिवसांपासून त्यांना कृष्णा हॉस्पीटलमध्ये जायचे होते. बऱ्यापैकी प्रकृती अस्थीर असणारे रुग्ण कृष्णामध्ये तर प्रकृती स्थीर असणारे रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्याच्या शासनाच्या सुचना होत्या. त्यानुसार संबंधित महिलेला उपजिल्हा रुग्णालयात ठेवले होते. मात्र नातेवाईकांनी दबाव आणल्यामुळे तिला कृष्णामध्ये हलविण्यात आले आहे.

जिवाची बाजी लावून लढणारेच पॉझिटिव्ह; याला जबाबदार कोण ?

बेजाबदारपणामुळे कऱ्हाडची कोरोनाची साखळी सातारला पाेहचली ?

...म्हणून त्यांच्यासह सर्वांवर आलेली हीच ती वाईट वेळ; सातारा जिल्हावासियांची भावना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.