Video : त्यांच्या उर्जेमुळेच मी आज कोरोनामुक्त

Video : त्यांच्या उर्जेमुळेच मी आज कोरोनामुक्त
Updated on

कऱ्हाड : तांबवे येथे सापडलेल्या कऱ्हाड तालुक्यातील पहिल्या कोरोनाबाधीत संशयीत रुग्णाची नुकतीच करण्यात आलेली चौथी तपासणी निगेटीव्ह आली आहे. त्यामुळे तांबवेकरांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. संबंधितास आज (शनिवार) तहसीलदार अमरदीप वाकडे, कृष्णा रुग्णालयाचे प्रमुख डॉ. सुरेश भोसले, मंडल अधिकारी पी.डी. पाटील यांच्या उपस्थितीत आज दुपारी घरी सोडण्यात आले. दरम्यान रुग्णाचे कुटुंबीय व नातेवाईकांनीही सोडण्यात आले आहे. त्यामुळे तांबवे गावावरील धोका टळला असला तरी खबरदारी म्हणून अजूनही 14 दिवस सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाने आवाहन केले आहे. काेरानामुक्त झालेला हा रुग्ण सातारा जिल्ह्यातील दूसरा रुग्ण ठरला आहे.  

कऱ्हाड तालुक्यातील पहिला कोरोनाबाधीत तांबव्यात सापडला होता. त्याच्या तपासणीनंतर त्याचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याने तांबव्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली. त्याची दखल घेवुन प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, तालुका आरोग्य अधिकारी संगिता देशमुख, तालुका पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, सुपने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा हुंदरे यांनी तांबवे येथे भेट देवुन आवश्यक त्या उपाययोजना राबवल्या होत्या. त्यादरम्यान तांबवेचे जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, सरपंच जावेद मुल्ला, उपसरपंच धनंजय ताटे, ग्रामविकास अधिकारी टी. एल. चव्हाण, तलाठी धराडे, पोलिस पाटील पवन गुरव, ग्रामपंचायत सदस्यांनी आरोग्य विभाग, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवल्या. आरोग्य विभागाच्यावतीने आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांनी घरोघरी जावुन सोशल डिस्टसींगची अंमलबजावणी करुन रुग्णांच्या आजारासह अन्य सर्व माहिती घेण्याचे काम तब्बल 14 दिवस केले.

त्याचबरोबर जिल्हाधिकारी शेखर सिंग, पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी संजय भागवत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठले, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचीन पाटील यांनीही दोनवेळा बैठका घेवुन अधिकाऱ्यांना सुचना दिल्या होत्या. दरम्यान संबंधित संशयीताच्या संपर्कातील तब्बल 54 जणांना तपासणीसाठी कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी संबंधितांचे अहवाल निगेटीव्ह आले. मात्र त्यातील 40 जणांना घरी सोडुन होम क्वॉरंटाईन करण्यात आले तर उर्वरीत जवळच्या संपर्कातील 14 जणांना पार्लेतील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. कोरोना संशयीताची नुकतीच करण्यात आलेली चौथी चाचणी निगेटीव्ह आली आहे. त्यामुळे धोका टळला आहे. संबंधितास आज दुपारी त्याच्या तांबवेतील घरी सोडण्यात आले. दरम्यान त्याचे कुटुंबीय व नातेवाईकांसह उर्वरीतांना पार्लेतील विलगीकरण कक्षातुन घरी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे सध्यातरी गावावरील धोका टळला असला तरी खबरदारी म्हणुन अजुनही 14 दिवस सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडुन योग्य त्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.

वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी मला पहिल्या दिवसांपासून उत्तम सांभाळले. वेळाेवेळी ते मला उर्जा देत हाेते. त्याच बळावर मी आज बरा झालेला आहे.
- काेराेनामुक्त रुग्ण.

Video : त्या ठणठणीत अन् घरी परतल्याही; नवीन 18 संशीयत दाखल

Video : चला मधुमेहच लॉकडाउन करु


Video : हारायचं न्हाय गड्या, रडायचं न्हाय...कोरोनाला हरवून टाकायचं हाय

कोरोनामुळे जगण्याला नवी दृष्टी

 CoronaFighters : ते नेहमीच आमच्यासाठी जीवावर उदार होऊन आपली सेवा बजावतात


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.